बापरे.. बारामतीतील रस्ते गेले खड्ड्यात..!लाखो रुपये गेले वाया.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 9, 2022

बापरे.. बारामतीतील रस्ते गेले खड्ड्यात..!लाखो रुपये गेले वाया.!!

बापरे.. बारामतीतील रस्ते गेले खड्ड्यात..!लाखो रुपये गेले वाया.!!                           बारामती(संतोष जाधव):- महाराष्ट्रात बारामतीचे नाव गाजतेय मग ते राजकीय असो, सामाजिक असो,शैक्षणिक असो, अथवा विकासा बाबतीत असो कोणत्याना कोणत्या कारणास्तव बारामती गाजतेय पण नुकताच बारामतीत गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आली होती ही कामे नवीन असो की दुरुस्ती चे असो पण ती केली गेली पण पाऊस झाला आणि पुन्हा रस्ते खड्ड्यात गेले जिकडे पाहावे तिकडे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे,ह्या रस्त्याच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले असून वाहन चालकाला याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक अपघात झाले, तर साचलेल्या खड्ड्यात पाणी साठल्याने त्याठिकाणी मच्छर झालेत, डेंग्यू सारखे मच्छर होत आहे त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले याला जबाबदार कोण?असा प्रश्न विचारला जात आहे, ह्या रस्त्याची कामे व डागडुजी ही बारामती नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत केली गेली परंतु या कामावर देखरेख करणारे अधिकारी हे त्यावेळी कामे चालू असताना काय करत होते हे आत्ताच्या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्था पाहून कळतंय यामुळे नागरिकांच्यात संताप होत आहे, अजून किती दिवस या रस्त्यातील खड्ड्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागणार, तर अपघाताला सामोरे जावे लागणार अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. विकास होतो पण तो करत असताना ठराविक ठेकेदाराला कामे दिल्याने इतरांचा होतोय हे विसरून चालणार नाही अश्या ठेकेदाराला कामे देऊन ती कामे निकृष्ट दर्जाचे होत असताना त्याकडे कानाडोळा करणारे यांना जाब कोण विचारणार बारामतीकर हे पाहत असून लवकरच ज्या भागात, प्रभागात,वार्डात रस्त्यावर खड्डे पडले आहे ते तात्काळ बुजवावे अन्यथा लवकरच नागरिकांच्या सहभागातून या खड्ड्यात सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव(पत्रकार) वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment