राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामतीत उद्योग व्यवसाय मार्गदर्शक मेळावा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 18, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामतीत उद्योग व्यवसाय मार्गदर्शक मेळावा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामतीत उद्योग व्यवसाय मार्गदर्शक मेळावा..               बारामती:- दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी पी टी काळे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा उद्योग व्यवसाय मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा बारामती दौरा यशस्वी झाला,बारामती शहरातील महिलांच्या उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यामध्ये महिलांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच बारामती एमआयडीसी मधील उद्योजक जाधव यांच्या उद्योगाला भेट देऊन जाधव यांनी युक्तीने बनवलेले देशी जुगाड नाविन्यपूर्ण असे त्यामुळे ऑपरेटरचा शारीरिक त्रास व वेळ कमी लागतो सदर कौशल्याबद्दल पी टी काळे यांनी महेंद्र जाधव यांचे कौतुक केले बारामती एमआयडीसीचे अधिकारी यांची व्यापार व उद्योग सेलचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज सावंत यांच्यासह भेट घेऊन बारामती एमआयडीसी मधील उर्वरित जागा वापर नसलेल्या जागा इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा केली, बारामती येथे आयोजित महिला उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात बारामती मधील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला  उद्योग मिळवण्यासाठी शेकडो महिलांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment