मार्तंड देव संस्थान जेजुरी च्या भ्रष्ट? विश्वस्तावर कारवाई साठी आमरण उपोषण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 24, 2022

मार्तंड देव संस्थान जेजुरी च्या भ्रष्ट? विश्वस्तावर कारवाई साठी आमरण उपोषण..

मार्तंड देव संस्थान जेजुरी च्या भ्रष्ट विश्वस्तावर कारवाई साठी आमरण उपोषण..
सासवड: -संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीचा खंडोबा सुप्रसिद्ध आहे.महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी भाविक भक्त गणांचा लोंढा सातत्याने येत असतो. त्या देवस्थान च्या अ वर्ग श्रेणीच्या मानाने देवसंस्थान चे विश्वस्त खऱ्या अर्थाने भाविकांना सोई सुविधा देत आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने प्रत्येक भाविकाला पडतो आहे.
 या मार्तंड देवसंस्थान च्या विश्वस्त मंडळाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या कडे आपल्या लेखी निवेदना द्वारे केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मार्तंड देवसंस्थान जेजुरी येथील विद्यमान विश्वस्त मंडळाने त्यांच्या कार्यकाळात धर्मादाय आयुक्तांच्या घटनेतील नियमांना तिलांजली देत स्वाधिकाराणे मुख्याधिकारी या पदाची नियुक्ती करत त्याच्या मार्फत लाखो रुपये गिळानंकृत केले आहेत.त्याच्या राहण्याची भोजनाची व्यवस्था भक्त निवासात केलेली आहे. डायलेसिस सेंटर साठी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देतात त्या पैशाचा देखील ताळेबंद लागत नाही. व्ही आय पी पासची जी 200रुपये फी आकरण्यात येते त्याचा देखील हिशोब नाही. अन्न छत्रसाठी जो किराणा माल घेतला जातो त्यासाठी कुठेही टेंडर प्रक्रिया राबवली नाही. गडावर जाण्यासाठी आपत्ती काळातील रस्त्यासाठी जो धर्मादाय आयुक्त साहेबांनी 2016साली जे आदेश दिलेले आहेत त्याला हरताळ  फासत या विश्वस्तानी पूर्वीच्या च मार्गांवर मुरूम टाकून दुरुस्ती दाखवत पैसे खिशात घातलेले आहेत. हालचिटाळ बांधण्यासाठी जी जमीन खरेदी केलेली आहे ती जमीन निर्धारित बाजार मुल्या पेक्षा अधिक दराने खरेदी दाखवून पैसे खिशात घातलेले आहेत. अशा प्रकारे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या विश्वस्त मंडळावर फोजदारी कारवाई करण्यासाठी दि.7डिसेम्बर 2022पासून आपल्या कार्यकर्त्यां समवेत धर्मादाय आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे धिवार यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले त्याचबरोबर ते असेही म्हणाले की या विश्वस्त मंडळाचे विश्वस्त होण्यापूर्वी दिलेले प्रतिज्ञा पत्रातील आर्थिक स्थिती व आत्ताची आर्थिक स्थिती तपासावी यासाठी आयकर विभागाला देखील पत्र दिले असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment