प्रेमाला वयाचं बंधन नसतं... 21 वर्षीय तरुण 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडून केलं लग्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 15, 2022

प्रेमाला वयाचं बंधन नसतं... 21 वर्षीय तरुण 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडून केलं लग्न..

प्रेमाला वयाचं बंधन नसतं... 21 वर्षीय तरुण 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडून केलं लग्न..
 मुंबई:- प्रेमाला वयाच बंधन नसतं याचा प्रत्यय नुकताच आला एका वायरल व्हिडिओ मुळे कळतंय की,जर एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर ती जात-पात,वय काहीच बघत नाही. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात कपलच्या वयात फार अंतर असतं. पण त्यांना या गोष्टीची काही चिंता नसते.अशीच एक काहीशी घटना समोर आलीय. एका तरूणाने त्याच्यापेक्षा 31 वर्षाने मोठ्या महिलेसोबत लग्न केलं.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत पाहायला मिळाले की, एक 21 वर्षाचा
तरूण लग्नाच्या स्टेजवर उभा आहे आणि
त्याच्यामागे एक लग्नातील खास चेअर दिसत आहे.दोघांच्या गळ्यात हार आहेत. कुणीतरी तरुणाला विचारलं की, तुम्ही लग्न केलं का? तर तरूण हो म्हणाला.व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने तरुणाला त्याचं वय विचारलं तर त्याने 21 सांगितलं आणि महिलेचं वय 52 आहे. समोरच्या एका व्यक्तीने विचारलं की, भावा तू योग्य केलं का. तर तरूण म्हणाला की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ते कधीही होऊ शकतं. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने विचारलं की, तुम्ही या लग्नाने आनंदी आहात का? महिला म्हणाली
की, हो आनंदी आहे. आम्ही दोघेही आनंदी आहोत.मात्र या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली.

No comments:

Post a Comment