बापरे..अनोखी शक्कल वापरून दुसरी शिकलेला बारामतीचा 'डॉन' दूधवाला बनून पुणे, सातारा, सोलापुरातील महिलांच्या दागिन्यांची करीत होते लूट..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 19, 2022

बापरे..अनोखी शक्कल वापरून दुसरी शिकलेला बारामतीचा 'डॉन' दूधवाला बनून पुणे, सातारा, सोलापुरातील महिलांच्या दागिन्यांची करीत होते लूट..!

बापरे..अनोखी शक्कल वापरून दुसरी शिकलेला बारामतीचा 'डॉन' दूधवाला बनून पुणे, सातारा, सोलापुरातील महिलांच्या दागिन्यांची करीत होते लूट..! 

सोलापूर(प्रतिनिधी) :- चोरी करण्याची अनोखी शक्कल कोण कसे वापरेल याचा नेम नाही अशीच घटना घडल्याने पोलीस ही चक्रावले होते याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुमच्या
दूधवाल्याचा पाहुणा आहे किंवा त्याची ओळख सांगून शहरातील बंगल्यातील व सोसायटीतील वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने
लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तिघांना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशोक ऊर्फ डॉन नामदेव गंगावणे व अशोक ऊर्फ कंट्या विश्वनाथ गंगावणे व अनिल रघुनाथ बिरदवडे (तिघेही रा. बांदलवाडी, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या त्या तरुण चोरट्यांच्या नावे पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर, शिरूर, सातारा(शिरवळ) येथील पोलिसांत अशाच प्रकारच्या एकूण
१४ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी बार्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन महिलांच्या गळ्यातील दागिने देखील चोरले होते. गुन्ह्यांची पद्धत अजब असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांचा तपास सुरूच ठेवला. जवळपास १०० ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून शहर पोलिसांनी अखेर त्या चोरट्यांना शोधलेच.ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस
उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकातील पोलिस
अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार यांनी पार पाडली. त्यांना गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे,संदिप पाटील, श्री.महाडिक यांच्या पथकांचीही मोठी
मदत झाली पुणे, साताऱ्यानंतर सोलापूरला टार्गेटगवळ्याच्या व्यवसायाशी संबंधित त्या तिघांनी सुरवातीला पुणे शहरातील महिलांना टार्गेट केले. त्या ठिकाणी पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांनी पुणे शहर सोडले आणि पुणे ग्रामीणमध्ये दूधवाल्याचा बहाणा करून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. तेथील
पोलिसांनी त्यांना पकडले होते आणि तेथून सुटल्यावर त्यांनी साताऱ्यात तसाच प्रकार सुरू केला. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्या तिघांनी सोलापूर शहराला टार्गेट केले. शहरातील बंगले व सोसायट्यांतील महिलांबद्दल जाणून घेतले. दूधवाला आल्यावर दूध घ्यायला कोणती महिला येते, तिच्या गळ्यात दागिने असतात का, याची माहिती त्यांनी मिळवली. त्यानंतर दूधवाल्याचे नाव जाणून घेऊन त्या
तिघांनी विजापूर नाका, जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीतील तीन महिलांना तुमच्या दूधवाल्याचा पाहुणा असल्याचे सांगून चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली. दुचाकीवरून जातानाही अनोखी शक्कल महिलेच्या गळ्यातील दागिने चोरल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालवणारा मागे बसायचा आणि मागे बसलेला दुचाकी चालवायचा. पोलिसांना अंदाज येऊ नये म्हणून त्यांनी अनोखी शक्कल अवलंबली. रात्रीच्या सुमारास बारामतीवरून शहराजवळ यायचे आणि दूधवाल्याच्या वेळेत ते महिलांना फसवत होते.

No comments:

Post a Comment