शिक्षकाला भरलाय भलताच चळ,शाळेतील मुलींना I LOVE YOU चे मेसेज करत जबरदस्तीने कीस घेत मारली मिठी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 28, 2023

शिक्षकाला भरलाय भलताच चळ,शाळेतील मुलींना I LOVE YOU चे मेसेज करत जबरदस्तीने कीस घेत मारली मिठी..

शिक्षकाला भरलाय भलताच चळ,शाळेतील मुलींना I LOVE YOU चे मेसेज करत जबरदस्तीने कीस घेत मारली मिठी..
                                                                       पुणे :- धक्कादायक माहिती पुढे आली चक्क शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉटसअॅपवर आय लव्ह यु असा मेसेज पाठवून त्यांचा जबरदस्तीने कीस घेणाऱ्या शारीरीक शिक्षण शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली
आहे. शाळेत झालेल्या गुड टच, बॅड टच कार्यक्रमात समुपदेशक महिलेकडे या मुलींनी केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. अविशान गोविंद चिलवेरी (वय २३, रा. येरवडा) असे या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०७/२३) दिली आहे.हा प्रकार कोंढव्यातील एका शाळेत नोव्हेबर २०२२ ते
२४ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून संबंधित शाळेत शारीरीक
शिक्षण शिक्षक आहे. त्याने शाळेतील तीन अल्पवयीन मुलींना त्यांच्या व्हॉटसअॅपवर आय लव्ह यु असा मेसेज पाठविला.त्या शाळेत असताना त्यांना जबरदस्तीने कीस घेऊन
त्यांना मिठी मारत विनयभंग केला होता. दरम्यान, २४ जानेवारी रोजी शाळेत फिर्यादी यांनी मुलामुलींसाठी गुड टच, बॅड टच हा कार्यक्रम
आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान या मुलींनी आपल्यावरील प्रसंग फिर्यादी यांना सांगितला.त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment