प्रेम प्रकरणातून मुलीला पळवल्यामुळे तरुणाच्या बहिणीला प्रेम पडले महागात;विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर...
पुणे:- मानवतेला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीला पळवल्यामुळे तरुणाच्या बहिणीला मोठा अनर्थ भोगावा लागला. प्रेमप्रकरणातून तरुणीला
पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण केले.तिली दोन दिवस डांबून ठेवले. बेदम मारहाण केली.त्यानंतर विवस्त्र करुन खोलीत डांबून ठेवले.शेवटी मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण सोशल मीडियावर टाकण्यात आले.काय घडला प्रकार
नंदकुमार माटे याच्या नात्यातील तरुणीस एका युवकाने पळवून नेले अन् तिच्याशी लग्न केले. यानंतर माटे व इतरांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीचे अपहरण केले.त्यांना त्या तरुणाचा पत्ता विचारलो. तो कुठे गेला आहे, याची विचारणा केली. परंतु दोघांनी ठावठिकाणी सांगितला नाही. यामुळे संतापलेल्या आरोपींनी दोघांना गजाने मारहाण केली. त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.
तक्रारदार महिलेच्या बहिणीस विवस्त्र करून तिचे
मोबाइलवर चित्रीकरण केले. चित्रीकरण सोशल
मीडियावर टाकले याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी
काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यात नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे,बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी(सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांचा समावेश आहे.अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment