बापरे..पुरुषाची झाली बाई, 'तो' होणार आई!आणि बाई चा पुरुष ती होणार बाप.!!लिंगपरिवर्तन तृतीयपंथीय जोडपं जन्म देणार बाळाला..!!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

बापरे..पुरुषाची झाली बाई, 'तो' होणार आई!आणि बाई चा पुरुष ती होणार बाप.!!लिंगपरिवर्तन तृतीयपंथीय जोडपं जन्म देणार बाळाला..!!!

बापरे..पुरुषाची झाली बाई, 'तो' होणार आई!आणि बाई चा पुरुष ती होणार बाप.!!लिंगपरिवर्तन तृतीयपंथीय जोडपं जन्म देणार बाळाला..!!!
केरळ:- नुकताच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर वायरल झाली की त्यांचं अभिनंदन केले जातंय.. काय आहे त्यामध्ये तर मातृत्व लाभणं ही स्त्रीसाठी अत्यंत आंनदाची बाब असते.आपल्याला आई-बाबा म्हणणारं कुणीतरी हवं असं अनेक जोडप्यांच स्वप्न असतं.असचं एक स्वप्न होतं जियाचं. ट्रान्सजेंडर असलेली जिया जन्माने
किंवा शरीराने स्त्री नसली तरी तीने आई
होण्याच स्वप्न पहिलं होतं. लिंगबदल करुन
पुरुषाचा स्त्री झालेली त्याचा जोडीदार जाहाद आता लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे लवकर हे कपल पालक होणार आहे. केरळमधील आहे तृतीयपंथीय जोडपं केरळच्या कोझिकोडमधील एक ट्रान्सजेंडर जोडपे जिया आणि जहाद, मार्चमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या या जोडप्याने बुधवारी इंस्टाग्रामवरुन ही आनंदाची बातमी शेयर केली. "जरी मी
जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नसली
तरी, माझ्या आत एक स्त्री स्वप्न होते की एक
बाळ मला 'आई' म्हणेल.. आम्ही एकत्र आहोत त्याला तीन वर्षे झाली. आई, त्याचे (जहाद ) वडील होण्याचे स्वप्न आहे आणि आज त्याच्या पूर्ण संमतीने आठ महिन्यांचे आयुष्य त्याच्या पोटात फिरत आहे" जियाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले. दोघांनी केलं लिंगपरिवर्तन जियाचा जन्म पुरुष म्हणून झाला पण त्याने लिंगपरिवर्तन तो स्त्रीमध्ये बदलला आणि जहादचा जन्म स्त्रीमध्ये झाला त्यानेही लिंगपरिवर्तन करुन पुरुषाचं आयुष्य स्विकारलं. जहादला गर्भधारणा झाली
कारण लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करताना
सर्जरीवेळी जाहदचे दोन्ही स्तन काढून
टाकण्यात आले. पण गर्भाशय आणि इतर
काही अवयव तसेच ठेवले होते. त्यामुळे
गर्भधारणेत यश आलं.जियाने शेअर केल्यापासून जिया आणि जहादच्या इंस्टाग्राम पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी या जोडप्याचे अभिनंदन करत असताना
दिसत आहेत आणि त्यांना भविष्यासाठी
शुभेच्छा देत आहेत. हार्ट इमोजींनी त्यांचा
कमेंट सेक्शन अक्षरश भरून निघालंय. "अभिनंदन! आज आम्ही इंस्टाग्रामवर पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे जी शुद्ध प्रेमाला सीमा नसते. तुमच्यासाठी अधिक शक्ती," एका वापरकर्त्याने लिहिले. "खूप आनंद वाटतोय. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो," दुसरा म्हणाला. "तो आत्मा आहे,आश्चर्यकारक!" तिसऱ्याने कंमेट केली."अभिनंदन !! आनंदी राहा आणि दीर्घायुष्य
जगा.. देव तुमच्या पाठीशी आहे," असं एक
युझर म्हणाला.असे अनेक मेसेस द्वारे त्या कपलचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment