कटफळ येथील झैनबिया स्कूलचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 23, 2023

कटफळ येथील झैनबिया स्कूलचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक..

*कटफळ येथील झैनबिया स्कूलचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक*

कटफळ (ता:बारामती):- येथील अब्बास मोहम्मद एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया स्कूलचा खाजगी प्राथमिक विभागांमध्ये इंग्रजी भाषेतून बारामती तालुक्यात प्रथम क्रमांकाने निवड होऊन जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
        जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा व पु.ल.देशपांडे करंडक स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा बी. टी. शहाणी हायस्कूल सभागृह, पुणे येथे पार पडल्या. या स्पर्धा मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतून आयोजन करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेत 29 शाळेची निवड झाली होती. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी *"हेल्थ अँड वेलनेस"* या विषयावर नाटक बसविले होते. या नाटकांमध्ये मुलांनी स्वच्छतेचे महत्व, नीटनिटकेपणा, सकस आहार न खाल्ल्यामुळे होणारे दुष्परिणाम आदी. विषय मांडले होते. यामध्ये आराध्या ढेरे, रुद्राणी लोणकर, शर्वरी शिरवळे, श्रेया चव्हाण, आदित्य उघडे, नैतिक म्हेत्रे, समर्थ घाडगे, विराज लवटे या विद्यार्थ्यांनी या नाटकाचे सादरीकरण केले. या नाट्य स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, कार्याध्यक्ष श्री.हनुमंत कुबडे, शिक्षण अधिकारी मा.संध्या गायकवाड,मा.सुनंदा वाखारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.आयुष प्रसाद आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. या नाटकासाठी सायली गायकवाड यांना उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक म्हणून सन्मानित करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका वैशाली काळे, मेहजबिन शेख, प्राजक्ता घुमटकर, सायली गायकवाड यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment