धक्कादायक..बँक कर्ज न फेडल्याने घर जप्तीची नोटीस आल्याने एकाने केली आत्महत्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 9, 2023

धक्कादायक..बँक कर्ज न फेडल्याने घर जप्तीची नोटीस आल्याने एकाने केली आत्महत्या..

धक्कादायक..बँक कर्ज न फेडल्याने घर जप्तीची नोटीस आल्याने एकाने केली आत्महत्या..                                                   पुणे :- लॉकडाऊन च्या काळात झालेली बिकट परिस्थिती त्यातुन कसे बसे सावरून कुठे तरी उबजारीला येण्याच्या अवस्थेत असतानाच बँक,फाईनास,सावकार यांचा होणारा त्रास यामुळे नागरिक अक्षरशः वैतागला असून जीवन जगणे असह्य झाले असल्याचं अनेक घडलेल्या दुर्दैवी घटनेने उघडकीस आले नुकताच एक धक्कादायक घटना घडली, बहिणीच्या पतीला मदत करण्यासाठी त्यांनी स्वत:चे घर गहाण ठेवून कर्ज काढून दिले. त्याशिवाय पतसंस्थेतील कर्जाला जामीनदार राहिले. पण मेव्हण्याने कर्जफेड न केल्याने बँकेने घरजप्तीची नोटीस पाठविली. त्या तणावातून एकाने गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली. खिशातील चिठ्ठीवरुन हा प्रकार उघड झाला
आहे.याप्रकरणी हिना विजय हेरकळ (वय ४५, रा.अलोकनगरी सोसायटी, कसबा पेठ) यांनी
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदीप ऊर्फ नितीन मधुकर मोरे आणि दिपा मोरे (रा. जोशी आळी,शिवाजीनगर गावठाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर येथी चेंबर्स येथे १७ एप्रिल २०२१ रोजी पहाटे घडला होता.विजय कृष्णराव हेरकळ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी
यांचे पती विजय हेरकळ यांची बहिण दिपा मोरे हिने तिचे पती संदीप मोरे यांना पैशाची गरज असल्याचे सांगितले.तेव्हा त्यांनी आपले राहते घर गहाण ठेवून साऊथ इंडियन बँकेतून १० लाख रुपयांचे कर्ज काढले.त्याचे हप्ते संदीप मोरे भरतील, या अटीवर त्यांनी ५ मार्च २०१९ रोजी त्यांना साडेआठ लाख रुपये दिले.परंतु, मोरे याने हप्ते भरले नाहीत. जानेवारी २०२० मध्ये त्यावरुन त्यांच्या नातेवाईकांमध्ये बैठक झाली.
संदीप मोरे याने ज्ञानदीप को ऑप सोसायटी पतसंस्था येथून कर्ज काढले होते.त्याला विजय हेरकळ जामीनदार राहिले होते. त्याचेही
हप्ते न भरल्याने पतसंस्थेना त्यांना नोटीस पाठविली होती. त्याबाबत हेरकळ यांनी वारंवार तिच्या पतीला कर्जाचे हप्ते भरण्यास सांगितले होते.परंतु, त्यांनी हप्ते भरले नाहीत. त्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये बँकेने गहाण ठेवलेले घर जप्त करण्याची नोटीस त्यामुळे ते सतत तणावात होते. त्यातूनच १७ एप्रिल २०२१ रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली.त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे विधी केल्यानंतर घरातील कपडे आवरत असताना त्यांच्या पँटच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यात दिपा मोरे व संदिप मोरे यांना माझ्या मृत्युस जबाबदार धरणे मी जेवढीकर्ज काढली आहे. ती सगळी या दोघांसाठी वापरली
आहेत. त्यामुळे इतर कोणासही जबाबदार धरु नये,असे लिहिलेले व त्यासाठी स्वाक्षरी केलेले आढळून आले. तसेच इंग्रजीमध्येही चिठ्ठी लिहून ठेवली होती.त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते. ही चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठविले होते.त्याचा अहवाल तब्बल २ वर्षांनी आता आला. ते हस्ताक्षर विजय हेरकळ यांचेच असल्याने आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment