शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून सुनिल सस्ते शेतकर्‍यांच्या हितासाठी रिंगणात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 24, 2023

शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून सुनिल सस्ते शेतकर्‍यांच्या हितासाठी रिंगणात..

शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून सुनिल सस्ते शेतकर्‍यांच्या हितासाठी रिंगणात..
बारामती:- बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक 2023 च्या निवडणूकीत बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनिल दादासाहेब सस्ते हे शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हितासाठी रिंगणात उतरले आहेत,सुनिल सस्ते यांनी बारामती नगरपरिषदेत कामातून सर्वसामान्य नागरीकांची मने जिंकली आहेत. अर्ध्या रात्री नागरीकांसाठी धावणारा नगरसेवक खरा कोविड योद्धा म्हणजे सुनिल सस्ते अशी आगळी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. तीच छबी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अर्ज दाखल करून सुनिल सस्ते शेतकर्‍यांच्या हितासाठी दाखवणार असल्याचे दिसते. 
बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून सुनिल सस्ते यांनी नागरीकांचे विविध प्रश्र्न सभागृहात मांडले. कित्येक ठिकाणचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झाले. सर्वसामान्य नागरीक हा केंद्रबिंदू मानून त्यांनी बारामती नगरपरिषदेत सक्षमपणे काम केले. शेतकर्‍यांच्या हितासाठी ते शेतकरी विकास पॅनेलमध्ये उमेवारी लढवत आहे. शेतकर्‍यांना हमी भाव मिळावा त्यांनी ऊन,वारा,पाऊस सहन करून पिकविलेल्या मालाला योग्य दर मिळावा. कृषि उत्पन्न बाजार समितीत असणारे विविध करांच्या बोजात तो दबला जातो त्या करातून मुक्त करून निव्वळ नफा त्यांना मिळावा हा त्यांचा प्रयत्न आहे. वेळोवेळी केंद्र सरकार आधारभूत किंमत (एमएसपी) ठरवित असते मात्र, शेतकर्‍यांना ती मिळत नाही, उघड लिलाव, चोख वजनमाप, विक्री केलेला मालाचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यात गेले पाहिजे इ.साठी सस्ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.मागील 20 वर्षपासून एकच सचिव कार्यरत असून ही एकाधिकार  शाही  आहे  अगदी चेअरमन सुद्धा सचिवंना जी सर करतात म्हणजे  चहापेक्षा  किटली  गरम  असा कारभार चालू आहे. म्हणून 
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांची होत असलेली अडवणूक, पिळवणूक व फसवणूक  थांबविण्यासाठी सुनिल सस्ते यांनी उमेदवारी दाखल केलेला आहे. शेतकर्‍यांचा मतास्वरूपात माझ्या बरोबर आशिर्वाद असल्याचे त्यांनी बारामती वार्तापत्राशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment