बारामती शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 20, 2023

बारामती शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश..

बारामती शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश..

बारामती:- बारामती शहरामध्ये पोलिसांनी लॉज चेकिंग सुरू केल्यानंतर वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी हा व्यवसाय भरवस्तीत सुरू केला.बारामती तील हरी कृपा नगर अनिकेत अपार्टमेंट फ्लॅट नंबर 10  या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यासाठी काही मुली आणलेले आहेत व गिऱ्हाईकांना ते पैसे घेऊन पुरवण्याचे काम करत आहे अशी गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना खास बातमीदारा तर्फे मिळाली त्यांनी तात्काळ निर्भया पथक व त्यांच्या कार्यालयाकडील स्टाफ पोलीस उपनिरीक्षक गीते, महिला पोलीस कर्मचारी जाधव धमे पोलीस कर्मचारी सुनील धकाटे गायकवाड यांना साध्या गणवेशात बारामती शहर पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले त्या ठिकाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना आदेश दिले की हरी कृपा नगर या ठिकाणी ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे सापळा कारवाईची तयारी करा. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस कर्मचारी अक्षय सिताप, पोलीस नाईक कल्याण खांडेकर, दशरथ जामदार यांनी सदर ठिकाणी बोगस ग्राहक पाठवण्यासाठी एक खाजगी इसम व दोन पंचांना बोलावून घेतले त्यांना सापळा कारवाईची माहिती दिली व खाजगी इसमाकडे पंचनाम्यात नोटेचे क्रमांक नोंदवून तीन पाचशेच्या नोटा वेश्या व्यवसाय करणारा मुली पुरवण्यासाठी दिल्या नंतर वरील स्टाफ पंच बोगस गिऱ्हाईक हे माननीय पोलीस उपाधीक्षक यांच्या आदेशान्वये त्यांच्यासोबत रेड कामी रवाना झाली  वरील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी हे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सरकारी जीप बारामती शहरकडील दोन सरकारी जीपमधून त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी 200 मीटर वर आडोशाला या तिन्ही सरकारी गाड्या लावण्यात आल्या बोगसपंटर याला त्या ठिकाणी ग्राहक म्हणून पाठवण्यात आले त्याने त्या ठिकाणी सदर आरोपी याच्याशी संपर्क साधला त्यांनी मुली देण्यास होकार दिला त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख यांना मिस कॉल केला सदरचा मिस कॉल आल्यानंतर दोन पंचा समक्ष वरील संपूर्ण पथकाने त्या ठिकाणी छापा मारला त्या ठिकाणी दोन इसम नामे1.युवराज रोहिदास बेंद्रे रा कर्जत ता कर्जत जि अहमदनगर.
2.शांतीलाल शिवाजी बेंद्रे रा कर्जत ता कर्जत जि अहमदनगर व दोन पीडित महिला ताब्यात घेण्यात आली .त्या ठिकाणी बोगस पंटरकडे दिलेले दीड हजार रुपयांच्या पाचशेच्या क्रमांक  नोंद केलेल्या नोटा तसेच इतर आणखी पैसे असे एकूण सहा हजार नऊशे वीस रुपये एवढे रोख रक्कम  आरोपीकडील तीन मोबाईल यामध्ये ग्राहकांना दाखवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या मुलींचे फोटो काढलेले असणारे किंमत अंदाजे तीस हजार व कंडोम पाकिटे  कुलर हे साहित्य त्या ठिकाणी मिळून आले त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून सर्व साहित्य जप्त करून आरोपी यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार अधिनियम व भारतीय दंड विधान संहिते मधील कलमा प्रमाणे  गुन्हा दाखल केलेला आहे  दोन्ही वरील इसमांना अटक करून उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे तसेच पीडित महिलांची रवानगी सुधार गृहात करण्यात येणार आहे. यामध्ये फ्लॅट धारकाची सुद्धा चौकशी करून तो माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून सील करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे . आरोपींच्या मोबाईल मधून माहिती काढून ग्राहकांची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments:

Post a Comment