२ हजार रुपयांची नोट व्यवहारातून बंद होणार....
दिल्ली:- ३० सप्टेंबरपर्यंत लोकांना २००० च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत, त्या बदल्यात इतर चलन मिळणार दि.२३ मे पासून नोटा बँकेत जमा करता येणार, एकावेळी 20 हजार रुपये किंमतीच्याच मर्यादेत जमा करून
घेतल्या जातील, दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा
निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या दोन हजारांच्या नोटा वापरता येणार आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
No comments:
Post a Comment