दीड तोळ्याच्या गंठणची मिळाली मालकीण..पोलिसांनी बजावले कर्तव्य..
बारामती:-नुकताच बस स्थानक वर गर्दीचा फायदा घेत चोरलेले दागिने परत मिळाली याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती शहर पोलिसांनी दोन महिलांना एसटीमध्ये चोरीचा दीड तोळ्याचा दागिना जवळ बाळगून मिळून आल्या म्हणून अटक केली होती त्यांच्यावर भादवि कलम 411 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली होती दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे चौकशी करून व दिवसभर त्यांचा मार्गक्रमण बघून पोलिसांनी त्यांच्या ताब्यात मिळालेल्या दीड तोळा दागिन्याच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता महिला नामे शबनम हमीद कबीर वय 24 वर्षे राहणार फलटण हिचे मुळगाव सणसर असल्याने एसटीमध्ये प्रवास करत असताना दोन महिलांनी तिला बस मध्ये चढताना धक्का दिला व धक्काबुक्की मध्ये पर्स मधून तिचे दीड तोळ्याचे गंठण काढून घेण्यात आले सदरची गोष्ट तिला भवानीनगर या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात आली परंतु घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे व बहुमूल्य असा दागिना चोरी गेल्यामुळे सदर महिला भावनिक झाली. तिला काही सुचले नाही पोलिसांनी केलेल्या वर्तमानपत्रातील आवाहनाला प्रतिसाद देऊन सदर महिला पोलीस स्टेशनला आली तिने तिच्या कडील पोलिसांनी जप्त केलेले दागिना ओळखला तसेच अटक केलेल्या महिलांना सुद्धा तिने ओळखलेले आहे याबाबत पोलिसांनी कलम 392 ची वाढ करून अधिक तपास सुरू केलेला आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार आबा जगदाळे याचा तपास करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
No comments:
Post a Comment