व्हिडीओ कॉलवर शरीर सुखाची मागणी केल्याचा विधवा महिलेचा दावा, आयपीएस अधिकारी यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 6, 2023

व्हिडीओ कॉलवर शरीर सुखाची मागणी केल्याचा विधवा महिलेचा दावा, आयपीएस अधिकारी यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल...

व्हिडीओ कॉलवर शरीर सुखाची मागणी केल्याचा विधवा महिलेचा दावा, आयपीएस अधिकारी यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल...
पुणे :- नुकताच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.आयपीएस अधिकारी निलेश
अशोक अष्टेकर (रा. आंबेगाव, बु., पुणे) यांच्याविरूध्द पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ठाण्यातील  कळवा येथे राहणाऱ्या 31 वर्षीय विधवा महिलेकडे त्यांनी शरीर
सुखाची मागणी केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. आयपीएस निलेश
अष्टेकर यांच्याविरूध्द गुरनं 271/1023
अन्वये भादंवि 354-A (2), 354-A (3),
354-D, 509, 67 आणि 67 A प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. महिला ही कळवा येथे रहावयास असून त्यांचे फेसबुकवर अकाऊंट 
आहे. आयपीएस निलेश अष्टेकर यांनी त्यांना
दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी
पावणे सात वाजण्याच्या सुमारास फेसबुक
मेसेंजरवर मेसेज केला होता. अष्टेकर  हे
पिडीत महिलेच्या परिचयाचे नव्हते. मात्र,
प्रोफाईलवरील फोटो वरून ते कोणीतरी
जबाबदार नागरिक असेल असे महिलेला वाटले.
त्यामुळे त्यांनी रिप्लाय दिला. त्यानंतर  त्याच्यामध्ये संभाषण सुरू झाले.संभाषणादरम्यान त्यांची ओळख झाली,त्यानंतर त्यांचे सर्वसाधारण बोलणे सुरू झाले.निलेश अष्टेकर यांनी मेसेंजरवर कॉल करून त्यांची पुन्हा एकदा ओळख करून दिली. ते म्हणाले, मी निलेश अष्टेकर, आय.पी.एस. पुणे, सध्या पोलीस भरतीचे काम करतो. तुला पोलिस मध्ये भरती करायचे असेल तर सांग. महिलेने त्यांना बहिणीचा मुलगा हा पोलिस भरतीची तयारी करीत असल्याचे सांगितले. तो मुंबई पोलिस भरती ग्राऊंडमध्ये नापास झाल्याचे देखील सांगितले होते. त्यावर अष्टेकर यांनी पोलिस भरतीचे काम करून देतो असे महिलेला सांगितले.त्यानंतर अष्टेकर यांनी महिलेकडून फोननंबर घेतला.दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.20 वाजता अष्टेकर यांनी महिलेला
व्हॉट्सअप कॉल केला.त्यावेळी अष्टेकर यांनी महिलेची सर्व वैयक्तिक कुटुंबाची माहिती विचारली. पोलिस भरती सुरू असून नोकरीस लावण्याचे आश्वासन देवुन त्यांनी महिलेशी प्रथम बोलण्यास व नंतर त्यांच्याशी जवळीक साधण्यास सुरूवात केली.तसेच व्हॉट्सअप मेसेजेस, व्हिडीओ कॉल माध्यमातून
बऱ्याच वेळा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली. मोबाईलवर अश्लील फोटो आणि
मेसेजस पाठविण्यास सुरूवात केली. केवळ
बहिणीच्या मुलाची पोलिस भरतीमध्ये निवड
व्हावी म्हणुन पिडीत महिला अष्टेकर यांच्या
संपर्कात होती. आणि रात्री 11.03 वाजता अष्टेकर यांनी महिलेला व्हॉट्सअॅप कॉल केला.
त्यावेळी ते स्वतः नग्न होते व त्यांनी महिलेला
नग्न होण्याची मागणी केली. हे ऐकुन महिलेला
धक्काच बसला.अष्टेकर यांनी अनेक अश्लील मॅसेज महिलेला केले. काही अश्लील व्हिडीओचे युआरएल देखील पाठविले.दि. 1 मार्च 2023 रोजी पुन्हा अष्टेकर यांनी महिलेला व्हॉट्सअप व्हाईस कॉल केला आणि पुन्हा तीच कॅसेट सुरू केली.तुझ्या मुलीला माझेकडे एक रात्र पाठवून दे
असे देखील ऐकविले. त्यानंतर देखील बऱ्याच
गोष्टी अष्टेकर यांनी पिडीत महिलेकडे बोलून
दाखविल्या.दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 10.56 आणि रात्री 11.03 वाजता अष्टेकर यांनी
महिलेला व्हॉट्सअॅप कॉल केला.त्यावेळी ते स्वतः नग्न होते व त्यांनी महिलेला नग्न होण्याची मागणी केली. हे ऐकुन महिलेला धक्काच बसला.
अष्टेकर यांनी अनेक अश्लील मॅसेज महिलेला
केले. काही अश्लील व्हिडीओचे युआरएल
देखील पाठविले.दि. 1 मार्च 2023 रोजी पुन्हा अष्टेकर यांनी महिलेला व्हॉट्सअप व्हाईस कॉल केला आणि पुन्हा तीच कॅसेट सुरू केली.
तुझ्या मुलीला माझेकडे एक रात्र पाठवून दे
असे देखील ऐकविले. त्यानंतर देखील बऱ्याच
गोष्टी अष्टेकर यांनी पिडीत महिलेकडे बोलून
दाखविल्या. अष्टेकर हे संभाषण घरून आणि कार्यालयातून करीत असल्याचे देखील फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला.त्यावरून अखेर दि. 2 मे 2023 रोजी त्यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस
आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

No comments:

Post a Comment