राजर्षी शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त डॉ.आंबेडकर स्मारक येथे अभिवादन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 6, 2023

राजर्षी शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त डॉ.आंबेडकर स्मारक येथे अभिवादन

राजर्षी शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त डॉ.आंबेडकर स्मारक येथे अभिवादन

बारामती दि.६: आरक्षणाचे जनक लोक कल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी समितीच्या वतीने माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण करत.बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे काही ऐतिहासिक प्रसंग सांगून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.तर कु.साक्षी जगताप ने सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
 
यावेळी समितीचे सदस्य माजी नगरसेवक गणेश सोनवणे,नितीन सोनवणे,सोमनाथ रणदिवे,राहुल कांबळे,गौतम शिंदे,शुभम अहिवळे,विश्वास लोंढे,राजेश पडकर,कृष्णा सोनवणे,सागर साबळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जगताप तर आभार प्रदर्शन बबलू जगताप यांनी केले.

No comments:

Post a Comment