मच्छिन्द्र टिंगरे यांच्यावर बदनामीकारक टिपणी करणाऱ्या विजय गावडे वर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 5, 2023

मच्छिन्द्र टिंगरे यांच्यावर बदनामीकारक टिपणी करणाऱ्या विजय गावडे वर गुन्हा दाखल..

मच्छिन्द्र टिंगरे यांच्यावर बदनामीकारक टिपणी करणाऱ्या विजय गावडे वर गुन्हा दाखल..                                                                      बारामती :- मच्छिन्द्र टिंगरे यांच्यावर बदनामीकारक टिपणी करणाऱ्या विजय गावडे या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला,याबाबत माहिती अशी की मच्छिन्द्र टिंगरे यांनी 2 मे रोजी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर केलेल्या एका पोस्ट केली. त्या पोस्ट वर विजय गावडे (पाटील) रा. मळद, दत्तनगर, ता. बारामती. यांनी अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले. याबाबत मच्छिन्द्र टिंगरे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून विजय गावडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत विजय गावडे यांनी मच्छिन्द्र टिंगरे व त्यांच्या आईबद्दल बदनामी होईल असे लिखाण केल्याचे म्हटले आहे..या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.                                 चौकट: दरम्यान मच्छिन्द्र टिंगरे यांनी याबाबत विजय गावडे व त्याच्या कुटुंबाची पक्षातून हाकलपट्टी करावी अशी मागणी. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे केली आहे.  टिंगरे यांनी मेसेज द्वारे अजितदादा पवार व संभाजी होळकर यांना ही घटना कळवली आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाने ठोस भूमिका न घेतल्यास आपण आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.                                        चौकट: मच्छिन्द्र टिंगरे यांच्या आई मालन टिंगरे या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांनी याबाबत राष्ट्रवादी हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. असा दावा केला जात आहे तर मग आता महिलांचा इतक्या खालच्या पातळीला जाऊन अपमान कारणाऱ्या कार्यकर्त्याला हाकलून देणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment