शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्या मार्फत सपकळवाडी येथे देहदान व अवयवदान या विषयावर चर्चासत्र.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 20, 2023

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्या मार्फत सपकळवाडी येथे देहदान व अवयवदान या विषयावर चर्चासत्र..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्या मार्फत सपकळवाडी येथे देहदान व अवयवदान या विषयावर चर्चासत्र..
बारामती:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्या मार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, सपकळवाडी येथे देहदान व अवयवदान या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात  नोडल अधिकारी डॉ प्रज्ञा भालेराव यांनी देहदान व अवयव दान या संकल्पना साध्या व सोप्या पद्धतीने ग्रामस्थांसमोर मांडल्या. तसेच देहदान व अवयव दान यातील फरक, प्रक्रिया व तांत्रिक बाबी याबाबात मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे समन्वयक व समाजसेवा अधिक्षक डॉ तुषार सावरकर यांनी अवयव दान म्हणजे काय, नैसर्गिक मृत्यु, मेंदू मृत अवस्था, जिवीत व्यक्तींद्वारे होणारे अवयव दान, मेंदू मृत अवस्थेत होणारे अवयव दान, या बाबतीतील कायदेशीर तरतुदी इत्यादी बद्दल माहिती दिली. डॉ तुषार सावरकर यांनी कार्यक्रमांत नागरीकांना अवयव दान जनजागृतीची प्रतिज्ञा दिली.

या कार्यक्रमाचे आयोजक श्री भाऊसाहेब सपकाळ, संचालक छत्रपती साखर कारखाना हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनायक साखरे व श्रीमती संध्या नाईक उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment