*अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा प्रदेश अभ्यास वर्ग बारामती शहरात आयोजित*
बारामती:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा ४ दिवसीय प्रदेश अभ्यास वर्ग दि. १५ ते १८ जुलै या दिवसांत बारामती शहरात आयोजित करण्यात येत आहे. तब्बल ४५ वर्षानंतर अभ्यास वर्ग आयोजित करण्याची संधी बारामती शहराला मिळाली आहे. या अभ्यास वर्गात पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या संघटनात्मक दृष्टीतून २३ जिल्ह्यांतून एकूण २५० प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित राहतील.
या वर्षी ९ जुलै ला अभाविप ने आपल्या ऐतिहासिक ध्येय यात्रेच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्र पुनर्निर्माणाचे उद्देश समोर ठेवून युवकांच्या मनात देशाप्रती समर्पणाची भावना अधिक दृढ व्हावी या संकल्पनेसोबत अभाविप कार्य करते. विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते तसेच आपल्या कार्यपद्धती मुळे विद्यार्थी परिषद ही जगप्रसिद्ध आहे. अभाविपच्या या कार्यपद्धतीत अभ्यास वर्गाचे एक अनन्य साधारण महत्त्व आहे. यात कार्यकर्त्यांचे विविध प्रकारे प्रशिक्षण होते. कार्यकर्ता प्रशिक्षणा करिता यावेळी विविध सत्र घेण्यात येतील. यात सैद्धांतिक भूमिका, कार्यपद्धती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती आदींचा समावेश असेल. याचसोबत, स्नेहालय चे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांची मुलाखत देखील यावेळी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी परिषदेचे कार्य विद्यापीठाशी अधिक संलग्नित असते, यामुळे विद्यापीठ प्रशासनाची योग्य माहिती कार्यकर्त्यांना असणे आवश्यक असते, या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एनएसएस सल्लागार समिती सदस्य व पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.राजेश पांडे यांचे विद्यापीठ प्रशासन रचनेवर एक सत्र असेल.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, “अभाविप ची ही संघटनात्मक यात्रा विद्यार्थी हित व सामाजिक उन्नती च्या अनेक सुवर्ण अध्यायांना सामावून घेणारी आहे. हे वर्ष अभाविप चे अमृत महोत्सवी वर्ष आहे. याचे औचित्य साधून विविध विषयांतील अनेक योजना अभाविप करेल. पश्चिम महाराष्ट्र प्रदेश म्हणून करण्यात येणाऱ्या पुढील वर्षभरातील योजनांवर या अभ्यास वर्गात चर्चा केली जाईल.”
संपर्क
प्रगती कराड ९३५९१६५१४३
(प्रदेश मीडिया संयोजक, अभाविप प. म.)
वैभव हगारे ७५०७३००३०३
(अभाविप, बारामती जिल्हा संयोजक)
No comments:
Post a Comment