आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ केला नाही तर एका फोनमुळे जेलमध्ये जाल! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 14, 2023

आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ केला नाही तर एका फोनमुळे जेलमध्ये जाल!

आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ केला नाही तर एका फोनमुळे जेलमध्ये जाल!
पुणे :-आई वडिलांना व्यवस्थित सांभाळत नाही, सासू सुनेचे वाद अश्या अनेक प्रकारे २८ दिवसांत ८८,६९२ कॉल केले गेले याबाबत मुलांनी किंवा मुलीने वृद्ध आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ केला नाही आणि आई-वडिलांनी पोलिसांत
तक्रार केली तर मुलांना दंड व जेल होऊ शकते. याबाबतची जनजागृती करण्यासाठी आणि वृद्धांना थेट मदत करण्यासाठी भारत
सरकारने एल्डरलाइन १४५६७ ही हेल्पलाइन
सेवा सुरू केली आहे. आता मुलांनी
आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ केला नाही तर एका फोनवर भारत सरकारच्यावतीनेच
त्यांच्या मदतीसाठी एल्डरलाइनचा प्रतिनिधी
येणार आहे.देशातील २० राज्यांमध्ये ही सेवा
सुरू आहे. ज्या राज्यातून कॉल जाईल,त्या भाषेमध्ये तेथील वृद्धांना अतिशय नम्र भाषेमध्ये काय मदत करू शकतो अशी विचारणा केली जाते. या हेल्पलाईनवर आजपर्यंत १२ लाख ७०
हजार १९१ इतके कॉल आले आहेत.त्यापैकी १ लाख ४२ हजार ४२ वृद्धांना एल्डरलाइनकडून थेट मदत केली गेली. उर्वरितांना फोन वरून मुलगा-सून यांच्याशी बोलून त्यांचे समुपदेशन
करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा असतात सर्वाधिक तक्रारी सुनेकडून मानसिक छळ केला जातो. वेळेवर जेवण
दिले जात नाही. मुलाकडून खर्चायला पैसे दिले जात नाहीत, औषधे आणून दिली जात नाहीत. या प्रकारच्या तक्रारी केल्या जातात.तर  मदतींसाठी १४५६७ येथे टोल फ्री क्रमांक वर संपर्क करावे माझ्या एकुलत्या एक मुलीने मला फसविले आहे. माझे पुण्यातील घर परस्पर विकले. त्यानंतरही विविध कारणांसाठी माझ्याकडून आजपर्यंत साठ लाख रुपये उकळले. मला बेस्टकॅन्सर आहे. त्याच्या
उपचारासाठी मला मदत करणे लांबच, उलट माझ्याकडे आणखी काही बचत आहे का आणि सोने नाणे आहे का याबाबत विचारणा करून
मानसिक छळ सुरू आहे. मला एल्डरलाईन हेल्पलाईनबद्दल माहीत नव्हते.आता मात्र याची मदत घेईन.असे पीडित वृद्ध यांनी सांगितले,समुपदेशन करूनही छळ थांबला नाही तर त्या गावातील उपविभागीय अधिकाऱ्यांशी
संपर्क करून दिला जातो.त्यानंतर त्यांच्याकडून
मुलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी
वृद्धांना मोफत वकीलही पुरविले जातात अशी माहिती मिळाली.

No comments:

Post a Comment