खळबळजनक...एकाच रात्रीत 16 घरे फोडल्याने बारामतीकरांच्यात भीतीचे वातावरण... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

खळबळजनक...एकाच रात्रीत 16 घरे फोडल्याने बारामतीकरांच्यात भीतीचे वातावरण...

खळबळजनक...एकाच रात्रीत 16 घरे फोडल्याने
बारामतीकरांच्यात भीतीचे वातावरण...
 बारामती:-बारामती शहरातील जवळपास 16 घराचे दरवाजे कैची अथवा कटरच्या साह्याने अवघ्या दोन ते तीन तासांच्या आत फोडून चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेसह
नागरिकांच्या सुरक्षितेताबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.चार चाकीमध्ये येत कटावणीच्या व इतर हत्यारांच्या सहाय्याने विविध
अपार्टमेंटमधील बंद घरे चोरटे निवडतात व त्यातील जवळपास 22 तोळे सोने व इतर रोख रक्कम लांबवितात ही घटना पोलिसांनाही विचार करायला लावणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. दिवसा होणारी लूटमारी, रात्रीची घरफोडी या प्रकाराने नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. अनेक अपार्टमेंटमध्ये सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याकडे आजपासून
सर्वांनीच पुन्हा एकदा लक्ष देण्यास आजच्या घटनेने एक शिकवण आहे.दिवसा व रात्रीची गस्त, अनोळखी दुचाकी व चारचाकी
थांबवून तपासणी, नाकाबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती, अचानक तपासणी मोहिम राबविणे, नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी थांबवून चौकशी करणे असे उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.छोटे मोठे गुन्हेगाराला पाठीशी न घालता कसून चौकशी केली पाहिजे,
बारामतीतील सीसीटीव्ही प्रकल्प रेंगाळला असल्याने त्याचा फटका बारामतीकरांना बसत आहे.रिंग रोड व शहरात येणाऱ्या रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे गरजेचं आहे असे झाल्यास अनेक गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकेल.दुसरीकडे नगरपालिकेला वारंवार विनंती करुनही अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून ते दुरुस्ती केले नाही,बंद पथदिव्यांचा अंधाराचा फायदा चोरटे उठवू शकतात ही बाब माहिती
असतानाही या बाबत काही केले जात नाही. नागरिकांचाही सहभाग अपेक्षित असून आपल्या आसपास संशयास्पद काही दिसल्यास पोलिसांना कळविणे गरजेचं आहे, पोलिसांनाही त्याची मदत होऊ शकते, त्या दृष्टीने नागरिकांनीही पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून या झालेल्या घरफोडी बाबत पोलीस कसून तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment