खबरदार.. शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा; माझा फोटो वापराल, तर कोर्टात खेचेन.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

खबरदार.. शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा; माझा फोटो वापराल, तर कोर्टात खेचेन.!

खबरदार.. शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा; माझा फोटो वापराल, तर कोर्टात खेचेन.!                छत्रपती संभाजीनगर :-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दौरा चालू असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी इशारा दिला याबाबत समजलेली माहिती अशी की,खबरदार..माझा फोटो वापराल तर..कोर्टात खेचेन, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेद्वारे दिला. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी मी 'इंडिया'तच असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गुरुवारी बीड येथे होणाऱ्या सभेच्या निमित्तानेही 'साहेब, आम्हाला आशीर्वाद द्या' असा मजकूर असलेले फलक बीडमध्ये झळकत आहेत. मी 'इंडिया'तच आहे, याची ग्वाही देत पवार यांनी 'पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते' असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेत पंतप्रधान मोदी यांनी 'पुन्हा येईन'ची घोषणा केली. फडणवीस पुन्हा सत्तेत आले; पण उपमुख्यमंत्री होऊन. मोदींना काय व्हायचं आहे माहीत नाही? आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. जे आमच्यातून गेले त्यांच्याशीही आमचा संबंध नाही, असे त्यांनी जाहीर केले.भेट वैयक्तिक होती याबाबत अजित पवार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीतला तपशील देण्याचे टाळत शरद पवार यांनी, कुटुंबात मी वरिष्ठ असल्याने कुणी माझ्याकडून सल्ला घेत असेल, त्यात चुकीचं काय, असा प्रतिप्रश्न केला,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही प्रयत्न केले, तरी शरद पवार भाजपच्या वळचणीला येण्याची शक्यता भाजप नेत्यांना वाटत नाही.राष्ट्रवादीतील शरद पवार गट व अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हासंदर्भात बजावलेल्या नोटिसीवर उत्तर देण्यास निवडणूक आयोगाने आणखी ३ आठवडे
मुदत दिली आहे.तुम्हाला वगळून काँग्रेस व शिवसेना (उबाठा) निवडणूक रणनीती आखत आहेत, याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात येत
आहेत. ती वस्तुस्थिती नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. मी 'इंडिया'तच आहे भाजपबरोबर जाणार नाही असे ही सांगितले.

No comments:

Post a Comment