*बारामती मध्ये पाटस रोड परिसरात तीन दिवसात ६७५ लोकांची आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी संपन्न.* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 25, 2023

*बारामती मध्ये पाटस रोड परिसरात तीन दिवसात ६७५ लोकांची आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी संपन्न.*

*बारामती मध्ये पाटस रोड परिसरात तीन दिवसात ६७५ लोकांची आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी संपन्न.*
बारामती (दि.२५) प्रतिनिधी: स्व.धनंजय देशमुख यांच्या स्मृतींचा उजाळा होत रहावा यासाठी स्व.धनंजय देशमुख ट्रस्टच्या वतीने शहरातील पाटस रोड येथे सुरू असलेल्या कॅम्प मध्ये तीन दिवसात ६७५ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करण्यात आली.

 श्री.जयसिंग (बबलु)देशमुख व श्री.आदित्य हिंगणे,महात्मा फुले तरुण मंडळ व स्व.धनंजय देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने वर्षभर लोक हिताचे उपक्रम घेतले जातात.यामध्ये मोफत मतदार नोदणी,आयुष्मान भारत योजना असे विधायक उपक्रम राबवले जातात नुकत्याच झालेल्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसाठी पाटस रोड परिसरातील अवचटइस्टेट, महादेव मळा, पतंगशाह नगर,देशमुख वस्ती , हिंगणे वस्ती ,अनंतआशा नगर , समर्थ नगर , बनकर वस्ती , सद्गुरु नगर , गायकवाड मळा येथील नागरिकांनी आयुष्मान भारत योजने अंतर्गत नोंदणी केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचा आहे.असे आयोजक श्री.आदित्य हिंगणे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment