बारामतीत पवार विरुद्ध पवार राजकीय वातावरण तापलं...*लोकशाहीत निवडणूकीला उभे राहणे प्रत्येकाला अधिकार-शरद पवार* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 17, 2024

बारामतीत पवार विरुद्ध पवार राजकीय वातावरण तापलं...*लोकशाहीत निवडणूकीला उभे राहणे प्रत्येकाला अधिकार-शरद पवार*

बारामतीत पवार विरुद्ध पवार  राजकीय वातावरण तापलं...*लोकशाहीत निवडणूकीला उभे राहणे प्रत्येकाला अधिकार-शरद पवार*
 बारामती:-बारामतीत नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरे सुरू केले त्यांनी एका ठिकाणी बोलताना म्हंटले,माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला मी वेगळा विचार करेन असे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत व्यापारी मेळाव्यात बोलले होते.याला अनुसरून बारामती लोकसभा
मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. लोकशाहीमध्ये
निवडणूकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले. आपण आपली भूमिका लोकांच्या
समोर मांडावी. गेली 55 ते 60 वर्ष आम्ही काय केलं हे लोकांना माहित आहे. बारामतीत उभा राहिलेल्या ज्या संस्था आहेत, त्यावेळी त्यांचे वय किती होतं, त्यावेळी आज आरोप करणारांचे वय
काय होते, याचे कॅल्क्युलेशन त्यांनी केले तर त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात येईल. या प्रकारची भूमिका मांडणे कितपत योग्य आहे असे पवार म्हणाले. तो त्यांचा व्यक्तिगत विचार
माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला मी वेगळा विचार करेन असे
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत बोलले होते. यासंबंधी शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत
आहेत. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, त्यांची भाषणे ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील व हे येणाऱ्या काळात दिसेल.

No comments:

Post a Comment