अखेर कारवाई होतेय, वादग्रस्त वृत्तपत्रात अवैध धंदे वर कारवाई ची केली होती मागणी, मात्र मोठे स्पलायर मोकाट कारवाई कधी? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 17, 2024

अखेर कारवाई होतेय, वादग्रस्त वृत्तपत्रात अवैध धंदे वर कारवाई ची केली होती मागणी, मात्र मोठे स्पलायर मोकाट कारवाई कधी?

अखेर कारवाई होतेय, वादग्रस्त वृत्तपत्रात अवैध धंदे वर कारवाई ची केली होती मागणी, मात्र मोठे स्पलायर मोकाट कारवाई कधी?
सुपे:-नुकताच बारामती तालुक्यातील अनेक गावांत अवैध धंदे जोमात असल्याचे बातमी लेखणीने वादग्रस्त या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती व त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीचा विकास करत असताना अवैध धंदेवर कारवाई चे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली होती या अनुषंगाने कदाचित पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असावी त्याबद्दल शतशः आभार, मात्र कारवाई होताना दुजाभाव नसावा कारण अवैध दारू सप्लाय करणारा हा मोठा व्यक्ती असल्याने तो मोकाटच असल्याचे स्थानिक नागरिक बोलताना व्यक्त होत आहे, असो नुकताच सुपे पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई झाली यामध्ये  एकूण 77,975/-रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत केला असून
सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील सुपे येथील  अवैध्य मटका चालक नामे 1. प्रल्हाद दिनकर खरात, 2. शांताराम तुकाराम धेंडे, 3. विजय नामदेव सकट वरील सर्व राहणार सुपे तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्यावरती छापा टाकून दोन मोटर सायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 65,425/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सुपे व मोरगाव हद्दीतील अवैद्य दारू विक्रेते नामे 1. संजना अर्जुन चव्हाण, 2. परस्मनी पोपी राठोड दोन्ही राहणार सुपे, 3. नवनाथ पांडुरंग तावरे, 4. धनु उर्फ धनंजय नवनाथ तावरे, 5. नंदकिशोर नामदेव नानावत, 6. वच्छला रमेश जगताप सर्व राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे 7. श्रीनिवास संभाजी काटे राहणार कोडोली तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावरती छापा टाकून कारवाई मध्ये एकूण 11560/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरील नमूद कारवाई मध्ये एकूण 77,975/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री सुदर्शन राठोड , यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीनेश कोळी, पोलीस अंमलदार भाऊसाहेब शेंडगे, विशाल गजरे , किसन ताडगे, साळुंखे , तुषार जैनक, नेहाल वनवे महिला पोलीस अमलदार अश्विनी तावरे , रेखा बांडे यांनी मिळून केली.

No comments:

Post a Comment