बारामती एमआयडीसी आगारमध्ये महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम..
बारामती:- बारामती आगार बारामती एमआयडीसी आगार हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला यावेळी आगार प्रमुख सौ .वृषाली तांबे, सौ.अपर्णा पवार आणि आगारातील सर्व महिला वाहक, चालक ,ऑफिस स्टाफ ,स्वच्छता स्टॉप ,असा दोन्ही आगारातील एकत्र कार्यक्रम एमआयडीसी एसटी डेपो येथे करण्यात आला, यावेळी चालक वाहक यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम घेण्यात आले सूत्रसंचालन सौ. उर्मिला शिंदे ,सौ.गोदावरी चाटे यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.वीरश्री ननावरे, सौ.आसमा शेख, सुजाता पानसरे, सौ.कामिनी कांबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment