बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 19, 2024

बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान..

बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान..
बारामती:-नुकतेच एस पी नागरी सहकारी पतसंस्था बारामती व ज्ञानमाता सेवाभावी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कार्यशाळा ज्येष्ठ नागरिक संघ येथे आयोजित केली होती. याप्रसंगी कार्यशाळेचे उद्घाटन श्री संभाजीनाना होळकर संचालक,पीडीसीसी बँक तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय जाधव प्रशासन अधिकारी बारामती नगर परिषद तसेच श्री आबाजी जगदाळे पोलीस अधिकारी बारामती शहर पोलीस स्टेशन व माधव जोशी सर, अध्यक्ष- ज्येष्ठ नागरिक संघ, ज्ञानमाता   सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष- श्री. अब्राहाम आढाव व सौ.अनिता गायकवाड शहराध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस बारामती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
 यावेळी समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने अनुक्रमे सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता पुरस्कारासाठी श्री राजेंद्र गलांडे दै.पुढारी, व श्री प्रमोद ठोंबरे दैं प्रभात, तसेच श्री संतोष जाधव संपादक लेखणीने वादग्रस्त यांना प्रदान करण्यात आला, तसेच श्री.चक्रपाणी चाचर यांना बारामती रत्न पुरस्कार देण्यात आला, श्री नामदेव जगताप यांना सर्वोत्कृष्ट स्कूल बस ड्रायव्हर पुरस्कार तर सौ. पूजा जंगम यांना समाज रत्न पुरस्कार, डॉ.श्री. तुषार गदादे यांना वैद्यकीय क्षेत्रातील समाज रत्न पुरस्कार, व अब्राहाम आढाव यांना माहिती अधिकार प्रशिक्षण पुरस्कार श्री.संभाजीनाना होळकर यांचे शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रस्ताविक भाषणात चेअरमन राहुल बनकर सरांनी सांगितले की, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा अजूनही लोकांना फारशी माहिती नाही. समाजात जागृती होणेसाठी व अन्याय विरूद्ध लढा देण्यासाठी हे अभियान प्रत्येक महिन्यानंतर राबविण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा असे सांगितले

प्रमुख मार्गदर्शक श्री.संभाजीनाना होळकर पुढे म्हणाले की, आजची माहितीचा अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा ही बारामतीत प्रथमच घेतली आहे, त्यामुळे नागरिक जागरूक राहतील व शासनाची माहिती तसेच दुर्लक्षित माहिती समोर येऊ शकेल त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता राहील. व वंचित घटकांना न्याय मिळेल, बारामती झपाट्याने बदलत चालली आहे, यांचा फायदा सर्वांना होत आहे, यावेळी पत्रकार श्री. राजेंद्र गलांडे तसेच प्रमोद ठोंबरे, संतोष जाधव यांचे कार्याबद्दल तसेच डॉ.तुषार गदादे श्री. चक्रपाणी चाचर नामदेव जगताप,आदीचे कौतुक केले, 

बारामती रत्न पुरस्कार मिळालेले श्री चक्रपाणी चाचर यांनी शिक्षणासाठी घेतलेले दत्तक मुलांची माहिती दिली ते करीत असलेले समाज कार्य या विषयी बोलले.

माधव जोशी सरांनी पतसंस्था कामकाजाचे कौतुक केले. प्रत्येकानी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे कार्यशाळा घेणे, पुरस्कार घेणे, लोकांना जमविणे आजच्या काळात तेवढे सोपे राहिले नाही त्यासाठी स्वतःकडे प्रामाणिकपणा व आत्मविश्वास लागतो असे सांगितले...

संजय जाधव प्रशासन अधिकारी तथा विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना सकारात्मक माहितीचा अधिकार व त्यामुळें फायदे - तोटे याचा लेखाजोखा मांडताना मांडला, खरोखरच माहितीचा अधिकार कायदा याचा समाजाप्रती उपयोग झाला पाहिजे असे बोलले व उर्वरित सौ. पूजा जंगम यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समोरील व्यक्तीना त्यांच्या आठवणीतील किस्से सांगून वातावरण आनंदित केले. त्यांचे शुभहस्ते सर्वांना सन्मानित केले व आढाव सरांचे शुभहस्ते प्रमाणपत्राचे वाटप केले. 

अब्राहाम आढाव यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५  कार्यशाळा संबंधी वेगवेगळी उदाहरणाने देऊन १ ते ३१ कलमांची विस्तृत माहिती दिली, जनता - प्रजा ही राजा आहे, आणि राजा झोपलेला आहे या उक्तीप्रमाणे विविध समस्याचे निराकरण केले. माहीतीचा कायदा घरा घरात गेला पाहिजे असे मत व्यक्त केले. माहितीचा प्रसार झाला पाहिजे, समाज उपयोगी माहितीचा वापर प्रभावीपणे केला तर माहिती देणारा व घेणारा यांचा समन्वय राहतो, याच कायद्याने आपणास समाजात चाललेली सार्वजनिक कामांची माहिती घेता येते. काही अधिकाऱ्यांची  करीत असलेल्या चुकांची उदाहरणे दिलेत. त्यांना ज्यावेळी कलामाने माहिती विचारली जाते तेंव्हा मात्र खडबडून जागे होतात असे भरपूर किस्से सांगितले व विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. आपण प्रत्येकाने माहिती अधिकार बाबतीत सतर्क राहिले पाहिजे असे प्रखर मत मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेवती पाटील व अफ्रीन बागवान यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सचिन नगरे, प्रमोद भोसले, शुभांगी बनकर, सतीश जगताप, करिष्मा पवार, मेघा जगदाळे, सुमय्या शेख, अंजना मासाळ, रिटा घोरपडे, कीर्ती सुतार कीर्ती जावळे, मनीषा शिंदे, वृंदा काशीद, सौ.जाधव, सौ मुळीक,श्री.नकाते, शितल खरचे, सोनिया मॅडम, सौं निकिता, चंद्रकांत भंडलकर, उमेश भोसले आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment