देसाई इस्टेट मध्ये शिवजयंती निमित्त गणेश मंदिर पायाभरणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 19, 2024

देसाई इस्टेट मध्ये शिवजयंती निमित्त गणेश मंदिर पायाभरणी..

देसाई इस्टेट मध्ये शिवजयंती निमित्त गणेश मंदिर पायाभरणी..
बारामती :प्रतिनिधी
बाल वयात शिव विचार ,संस्कार महत्वाचे असून गड किल्ले ज्याप्रमाणे भक्कम आहेत त्या प्रमाणे विचारांचा पाया भक्कम व मजबूत करा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अधीक्षक हनुमंत पाटील यांनी केले.
१९ फेब्रुवारी रोजी देसाई इस्टेट येथे आयोजित शिवजयंती निमित्त  नियोजित गणेश मंदिराचे पूजन प्रसंगी  हनुमंत पाटील उपस्तीत शिवभक्तांना मार्गदर्शन करत होते .
या प्रसंगी,बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, मा. नगरसेवक अतुल बालगुडे,जळोची  ग्रामपंचायत चे मा. सरपंच छगन आटोळे व देसाई इस्टेट राष्ट्रवादी शाखा, श्री गणेश तरुण मंडळ चे पदाधिकारी ,समस्त देसाई इस्टेट मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी होत असल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी कौतूक केले. .
शिव विचार डोक्यावर घेऊन नाचायचे नाही तर डोक्यात घेऊन सामाजिक उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे मा. नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.
आभार अनिल सावळेपाटील यांनी मानले. 


No comments:

Post a Comment