धक्कादायक..माहेरातील प्रेमप्रकरण सासरी समजते की काय या भीतीने 6 वर्षाच्या मुलाचं शीर धडावेगळे करत,केला होता आत्महत्येचा प्रयत्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 22, 2024

धक्कादायक..माहेरातील प्रेमप्रकरण सासरी समजते की काय या भीतीने 6 वर्षाच्या मुलाचं शीर धडावेगळे करत,केला होता आत्महत्येचा प्रयत्न..

धक्कादायक..माहेरातील प्रेमप्रकरण सासरी समजते की काय या भीतीने 6 वर्षाच्या मुलाचं शीर धडावेगळे करत,केला होता आत्महत्येचा प्रयत्न..
सोलापूर :- आजकाल प्रेमात कोण कुठल्या थराला जाईल व त्यातून विचित्र घटना घडत आल्या हे पाहिले आहे, परंतु माहेरात झालेल्या प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून या भीतीने चक्क पोटच्या मुलाचा खून करण्यात आला असल्याचे माहिती नुकताच समजली या मिळालेल्या माहितीनुसार माढा तालुक्यात कव्हे येथे सहा वर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर तिच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलाच्या आईवरील उपचार पूर्ण होताच पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक
दिवसाची कोठडी मिळाली. माहेरातील प्रेमप्रकरण सासरी समजेल आणि पुढे
मुलालाही त्रास होईल या भीतीने चिमुरड्याचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.प्रणव गणेश चोपडे (वय ६) असे खून झालेल्या चिमुरड्याचे
नाव असून, त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. याप्रकरणी मुलाची आई आरोपी कौशल्या गणेश चोपडे हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरातील प्रेम प्रकरण
सासू, सासऱ्यांना कळते की काय? या विचाराने ती कायम बैचेन होती. त्यामुळे ती आत्महत्येच्या विचारात होती. सन २०२२ मध्येही तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला होता. मात्र कुटुंबाने खासगी डॉक्टरांकडून उपचार करून
गोळ्या सुरू ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पती-पत्नींमध्येही काही कारणास्तव कधीकधी भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी प्रथमत: तिने 'टीव्ही पाहतो काय?' म्हणत लहान मुलाचा गळा आवळला. नंतर तो मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. परंतु
आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर?असा विचार करून गळा आवळल्यानंतर तिने कुऱ्हाडीने त्याचे शीर धडावेगळे केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यानंतर तिने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यामुळे
तिने लागलीच दीड ग्लास तणनाशक औषधाचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.या अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment