अ.ब.ब..४४ वर्षांच्या विवाहित महिलेवर ३० वर्षीय पोलीसाचा बलात्कार, ब्लॅकमेल करून पैसे ही उकळले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 31, 2024

अ.ब.ब..४४ वर्षांच्या विवाहित महिलेवर ३० वर्षीय पोलीसाचा बलात्कार, ब्लॅकमेल करून पैसे ही उकळले..

अ.ब.ब..४४ वर्षांच्या विवाहित महिलेवर ३० वर्षीय पोलीसाचा बलात्कार, ब्लॅकमेल करून पैसे ही उकळले..
छत्रपती संभाजीनगर :- महिला अत्याचारात वाढ होत असेल तर कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचे दिसत असताना चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच अत्याचार करून ब्लॅकमेल करत दोन लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलीय. या प्रकरणी ३० वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ४४ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिलीय.याबाबत मिळालेली माहिती असी की, शहर पोलीस दलात
कार्यरत असलेल्या अंमलदार विशाल सुखदेव दांडगे याच्याविरुद्ध ४४ वर्षीय महिलेने तक्रार दिलीय. या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.तक्रार देणारी महिला ही तिच्या मुलांसह छावणी परिसरात राहते. विशाल दांडगे हा काही वर्षांपूर्वी वेदांतनगर पोलीस ठाण्यात होता. त्यावेळी वेदांतनगर परिसरात खासगी काम
करणाऱ्या महिलेशी त्याची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघेही त्यानंतर सतत भेटत होते.विशाल दांडगे याने अनेकदा हॉटेलमध्ये, मिलन कॉर्नर इथं असणाऱ्या सरकारी निवासस्थानी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप महिलेने तक्रारीत केले आहेत.पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केले, त्यानंतर ब्लॅकमेल
करत दोन लाख रुपये उकळले. तसंच अचानक बोलणं बंद केल्याचंही महिलेने म्हटलंय. संबंधित महिला पतीपासून विभक्त झाली आहे. ती आपल्या मुलांसोबत राहते.याआधीही महिलेने अत्याचाराचा अर्ज पोलिसात केला होता. पण तिने अर्ज मागे घेतले होते. आता शुक्रवारी पुन्हा
तिने पोलीसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

No comments:

Post a Comment