बारामतीत लोकसभा निवडणुक दरम्यान पैसे वाटले प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 19, 2024

बारामतीत लोकसभा निवडणुक दरम्यान पैसे वाटले प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल..

बारामतीत लोकसभा निवडणुक दरम्यान पैसे वाटले प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात
व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल..
बारामती:- बारामती लोकसभा निवडणुकीत बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या सूचनेवरून पंचायत समितीचे कर्मचारी केशव तुकाराम जोरी यांनी शहर पोलिस ठाण्यात व्हिडीओ मधील अज्ञात इसमा विरोधात पैसे वाटप केल्याच्या
कारणावरून फिर्याद दिली आहे.सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार  आमदार रोहित
पवार यांनी बारामती येथील साठेनगर मधील
अंगणवाडी परिसरात लोकसभा निवडणुक प्रक्रीये दरम्यान पैसे वाटप केल्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल केला होता त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या सूचनेवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment