आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
बारामती(प्रतिनिधी)-दि २५-बारामती शहरांमध्ये आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना महात्मा गांधी बालक मंदिर शाळा या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बारामती शहर पोलीस निरीक्षक श्री.संतोष घोळवे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.आडाव मॅडम तसेच श्री.शशिकांत शहा. आणि उपस्थित सर्व मान्यवर शाळेचे पदवीधर शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आभाळमाया ग्रुपच्या सौ.सुरभी ओसवाल.सौ.अर्चना भंडारी .सौ.अल्पा भंडारी.सौ.अंजली देसाई.सौ कल्पना ओसवाल.सौ.लता ओसवाल. सौ.आरती भंडारी.सौ शितल मुथा. सौ मंजू बोराणा. सौ.सपना शहा. सौ.मेघना गुगळे सौ.वैजयंती मेहता यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment