बापरे.. बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारांच्या आदेशाला केराची टोपली..!बा.न.प.चा भोंगळ कारभार..(भाग 2).
बारामती:-बारामतीत शारदा प्रांगण शाळा येथे संत जगतगुरु तुकाराम महाराज पालखी मुक्कामी होती त्यानंतर संत सोपान काका महाराज पालखी मुक्कामी असते यासाठी लाखो रुपये खर्च बारामती नगरपरिषद करीत असते ते त्यांनी केलेच पाहिजे त्यासाठी निविदा निघते ती कशी निघाली त्यात काय काय घडले हे नंतरच्या अंकात प्रसिध्द करणार आहोत.तद्नंतर पालखी बारामतीतुन गेल्यानंतर शारदा प्रांगण येथे शाळेच्या लहान मुलांना खेळाच्या मैदानात असणारा लोखंडी मंडप बांधला जातो तो पालखी गेली तरी तसाच असल्याने याठिकाणी शिकत असणारे लहान मुलं, मुली या मंडपाच्या रॉड ला खेळताना अनेक वेळा इजा झाल्याचं बारामती नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाला व यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यांना याची कल्पना लेखी दिली होती याबाबत मुख्याधिकारी यांनी तसे लेखी आदेश मंडप मालकाला दिले की पालखी गेली असून मंडप काढण्यात यावा पण या आदेशाला न जुमानता आजही तो मंडप या खेळाच्या मैदानात उभा आहे, यामागे नक्की काय गौडबंगाल आहे हे कळले नसले तरी मात्र मुख्याधिकारी यांनी दिलेला लेखी आदेश मात्र धुडकावून लावल्याचे दिसत असून याच मैदानात कोणताही कार्यक्रम घेऊ नये असा ठराव असताना(फक्त शालेय सांस्कृतिक,सुटीच्या दिवशी वगळता)त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने याबाबत जनआंदोलन होणार आहे तरी याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी यांची असणार आहे, दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्यास बारामती नगर परिषदेचे अधिकारी जबाबदार असणार आहे.
No comments:
Post a Comment