बारामती मध्ये "*हर घर तिरंगा यात्रा*" कार्यक्रम संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 14, 2024

बारामती मध्ये "*हर घर तिरंगा यात्रा*" कार्यक्रम संपन्न..

बारामती मध्ये "*हर घर तिरंगा यात्रा*" कार्यक्रम संपन्न..
बारामती:- बारामती परिसर सजग नागरिक यांच्यावतीने आज बारामती मध्ये "*हर घर तिरंगा यात्रा*" कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक- बारामती परिसर सजग नागरिक,संयोजक - गौरव पापत,सहसंयोजक - रोहित शिंदे, संदीप बनकर, सुनील गायकवाड, वैभव कोठारी, सागर चिंचकर, यांच्या सह कार्यक्रमात सहभागी असलेले संघटना व पत्रकार बंधू व राजकीय संघटना व देश प्रेमी नागरिक यांच्या सहभागाने कार्यक्रमाची सुरुवात शारदा प्रांगण ते भिगवण चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक,(इंदापूर चौक), गांधी चौक ते भिगवन चौक येथे कार्यक्रमाचा समारोप झाला,
"हर घर तिरंगा यात्रेत बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना, व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तर अधिकारी संघटना यांचे अध्यक्ष निलेशभाई कोठारी, व स्वानंद खंडागळे, कबीर तांबोळी, पवन घोरपडे, दिलीप तांबे, जीवन मोदी, मोहनराव रणदिवे, पोपट गादिया, डॉक्टर मंगेश खंडागळे,पत्रकार संतोष जाधव व पत्रकार बांधव,व राजकीय संघटना भारतीय जनता पार्टीचे बारामती शहर अध्यक्ष- सुजितजी वायसे, व प्रमोद डिंबळे पाटील, मुन्ना तांबोळी, संजय गिरमे, बापू लोखंडे, शिरदळे आण्णा, दिनकर काटे, सुभाष वाकळे, व भारतीय जनता पार्टीचे माळेगाव मंडलचे अध्यक्ष-  प्रमोद (ननू पाटील) तावरे, व बारामतील सर्व देशप्रेमी नागरिक या सर्वांचा मोठ्या संख्येने सहभाग झाले होते यावेळी बारामतीतील मुख्य चौकातून फेरी काढण्यात आली.

No comments:

Post a Comment