जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल..भावानेच भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करुन केले साठेखत.. !
पिंपरी :- सद्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे जमीन किती महत्वाची आहे व त्यासाठी वाटेल ते घडत असलेल्या घटना पाहता लक्षात येईल चक्क वडिलोपार्जित सामाईक क्षेत्राचे साठेखत करताना भावाने आपल्या
दुसऱ्या भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करुन
फसवणूक केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आनंदा दामु भोसले (वय ६०, रा. पाडळी, वाडा रोड, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार खरेदी देणार गोविंदा ऊर्फ रामू दामु भोसले
(रा. पाडळी, ता. खेड), खरेदी घेणार धिरज कुमार सुरेंद्र शेठीया (रा. चाकण, ता. खेड), साक्षीदार सुनिल गणपत वाळुंज (रा. शिरोली, ता. खेड), दीपक कोंडीभाऊ पाबळे(रा. कडघे, ता. खेड), तोतया व्यक्ती आणि अॅड. रवींद्र कर्नावट (रा. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा
प्रकार चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १७ डिसेबर २०२१ रोजी घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची
पाडळी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यात रामू भोसले याच्या हिस्स्याचे ४१ आर क्षेत्राची विक्रीसाठी त्याने साठेखत तयार केले. या साठेखताला कायदेशीर मान्यता देण्यासाठी फिर्यादी यांची सही अंगठे आवश्यक होते.
चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादी यांच्या जागी कोणीतरी दुसरी व्यक्ती उभी करुन त्यावर फिर्यादीचे खोटे व बनावट सह्या अंगठे करुन या दस्ताचा वापर करुन खरेदी खत करुन त्याद्वारे फेरफार करीत असताना आढळून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार केली असून
पोलीस उपनिरीक्षक तलवाडे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment