दणका डीजे चा;चार तास डीजे समोर थांबला,अण बहिरा झाला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 25, 2024

दणका डीजे चा;चार तास डीजे समोर थांबला,अण बहिरा झाला...

दणका डीजे चा;चार तास डीजे समोर थांबला,अण बहिरा झाला... 
पुणे:- गणेश विसर्जना वेळी डिजेचा दणदणाट सर्वत्र होता.तसाच दणदणात पुणेकरांनीही अनुभवला. पण त्याचा फटका एका 32 वर्षाच्या तरूणालाही बसला आहे.हा तरूण पुण्यात गणेशविसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता.तो डिजे समोर तब्बल चार तास होता. शिवाय ज्या वेळी विसर्जन मिरवणूक कात्रज चौकात आली, त्यावेळी चार गणेश मंडळ एकत्र आली होती. त्या वेळी चारही मंडळाच्या डीजेचा आवाज घात करून गेला. तो तरूण, ज्यावेळी घरी गेला त्यावेळी त्याला ऐकू येत नव्हते. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी डॉक्टरांनी जे सांगितलं त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकरली.गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजेच्या दणदणाटामुळं 32 वर्षीय तरुण सागर मोरेचे दोन्ही कान निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा एक कान 95 टक्के तर दुसरा कान 85 टक्के निकामी झाला आहे.सागर मोरे याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला आता घरी सोडण्यात आले आहे. गणेश विसर्जनावेळी कात्रज चौकामध्ये चार गणेश मंडळांच्या डीजेच्या दणदणाटेमुळेच सागरचे दोन्ही कान निकामी झाले आहे.सागर याला दोन मुली आहेत. छोटी-मोठी बांधकाम कंत्राटी घेऊन तो त्याचं घर चालवतो. मात्र आता दोन्ही कान निकामी झाल्यामुळे, सागरला भविष्याची चिंता सतावत आहे.दरम्यान वेळेवर झालेल्या उपचारानंतर डाव्या कानाला 40 टक्के फरक पडला आहे. तर उजवा कान दुरुस्त होण्याची शक्यता फार कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.डॉक्टरांनी त्याला सर्जरीचा सल्ला दिला आहे.उपचारानंतरही डाव्या कानाला 41% फटका बसला आहे,तर उजव्या कानाला 86% टक्के फटका बसला आहे.सागर समोर आता ऑपरेशन करण्या शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहीलेला नाही. त्यातूनही किती फरक
पडेल याची हमी नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल याची चिंता त्याला लागली आहे.DJ चा आवाज किती घातक ठरू शकतो याचं हे उदाहरण होय.

No comments:

Post a Comment