आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंचायत समिती येथे महिलांना मार्गदर्शन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 11, 2025

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंचायत समिती येथे महिलांना मार्गदर्शन..

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंचायत समिती येथे महिलांना मार्गदर्शन..
बारामती, दि.11: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि विधी सेवा समिती बारामती यांचे संयुक्त विद्यमाने  पंचायत समिती बारामती येथे (दि. 8 मार्च) रोजी आयोजित कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग-3 एच.ए.वाणी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन.आर.वानखडे, गट विकास अधिकरी डॉ. अनिल बागल, सहा.गटविकास अधिकारी नंदन जरांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने,  बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. पी.ए.बर्डे, उपाध्यक्ष अॅड.सचिन कोकणे,  उपाध्यक्षा अँड.प्रिती शिंदे- निंबाळकर, सदस्य अँड.शकिला अत्तार आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमात महिलांचे अधिकार, महिलांची सामाजिक, कायदेविषयक, आर्थिक, शैक्षणिक सुरक्षितता, महिलांना समान संधी तसेच त्यांच्याकरीता जकीय, औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रातील उपलब्ध संधी, विविध क्षेत्रात आरक्षण, सामाजिक दृष्टीकोन, लिंगभेद समानता, महिलांना शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबन, विविध कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment