बारामतीत महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक जबरदस्ती केल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावासाची व २०,००० /- रुपये दंडाची शिक्षा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 11, 2025

बारामतीत महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक जबरदस्ती केल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावासाची व २०,००० /- रुपये दंडाची शिक्षा..

बारामतीत महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक जबरदस्ती केल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावासाची व २०,००० /- रुपये दंडाची शिक्षा..
बारामती(संतोष जाधव):- शरद पोपट खरात यांना महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक जबरदस्ती
केल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावासाची व २०,००० /- रुपये दंडाची शिक्षा १ श्रीमती एस. आर. पाटील सो.बारामती येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सुनावली याबाबत मिळालेली माहिती अशी की,शरद पोपट खरात रा. राजाळे ता. फलटण जि. सातारा यांना बारामती येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ श्रीमती एस. आर. पाटील यांनी दिनांक
११/०३/२०२५ रोजी भा.द.वि. कलम ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १०,०००/ रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास तसेच भा.द.वि. कलम ३५४ अन्वये, आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५,००० / रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास तसेच भा.द.वि.
कलम ५०६ अन्वये, आरोपीस ६ महीने कारावासाची शिक्षा व ५,०००/ रूपये दंड
व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणाची हकीकत
सदरच्या केसमध्ये आरोपी याने ३१/०३/२०२१ ते १२/०४/२०२१ च्या दरम्यान फिर्यादीस बदनामीची धमकी देवून वेळोवेळी फिर्यादीचा मुलगा घरात नसल्याचा फायदा घेवून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व धमकी देवून गलिच्छ शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्यादीने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार केल्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला.त्या अनुषंगाने स.पो.नि. यु.एम. दंडीले यांनी सखोल तपास करुन सदरच्या ३७६, ३५४, ३२३, ५११, ५०४, ५०६ आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम प्रमाणे मे.कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे व त्यांना सहाय्य अॅड. परीश बाबूराव रुपनवर यांनी सरकार पक्षातर्फे ०८ साक्षीदार तपासले. सदर पिडीतेने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली.तसेच वैद्यकीय पुरावा व परिस्थितीजन्य पुराव्या वरून आरोपी यांना मा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश - १ सुरेखा आर पाटील सो यांनी आरोपी नामे शरद पोपट खरात यांना दोषी धरून शिक्षा सुनावली आहे.विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी शरद पोपट खरात यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे व अँड परीश बाबुराव रुपनवर यांना कोर्ट अंमलदार
म.पो.कॉ. उमा एन. कोकरे यांनी तसेच कोर्ट पैरवी श्रेणी पो.स. ई. नामदेव नलवडे यांनी सहकार्य केले.तसेच सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी स.पो.नि. यु. एम. दंडीले यांनी केला होता.

No comments:

Post a Comment