बापरे..अवघड जागेवर लाल तिखट लावून अल्पवयीन मुलास मारहाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 3, 2025

बापरे..अवघड जागेवर लाल तिखट लावून अल्पवयीन मुलास मारहाण..

बापरे..अवघड जागेवर लाल तिखट लावून अल्पवयीन मुलास मारहाण..
बारामती:-बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील महिलेने नुकताच बारामती पोलीस स्टेशन येथे इसम रा डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे याच्या विरोधात तक्रार दिली, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27/02/2025 रोजी सायंकाळी 7/30 वा चे सुमारास डोर्लेवाडी  ता. बारामती जी पुणे येथे माझा नातु  यास भेटण्यासाठी डोर्लेवाडी येथे गेले असता तो मला पाहुन मोठमोठ्याने रडू लागला त्यावेळी मी त्याला समजावुन सांगुन विश्वसात घेवुन  त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने मला सांगितले की, आज दुपारी मी तसेच  इसम यांची मुलगी असे आम्ही दोघे अंथरुनात झोपलेलो होतो. त्यावेळी तेथे  हे आले व त्यांना एका अंथरुनात झोपलेला पाहील्याने त्या कारणावरुन मला माझे पाठीवर पोटावर उजव्या बाजुस व डाव्या हाताचे दंडावर मोबाईलचे चार्जरचे वायरने मला मारहाण केली तसेच माझे अवघड जागेवर लाल तिखट लावले व मला एक चमच लाल तिखट खाण्यास दिले असे सांगितले, त्यानंतर मी तसेच आमचे गावी गेले व माझे घरातील लोकांना  यास मारहाण केले बाबत सांगितले त्यानंतर माझा मुलगा  याने  दिनांक 28/02/2025 रोजी डोर्लेवाडी येथे जावुन नातु  यास घेवुन घरी आला आम्ही या समाजाचे आहे हे यांना माहीत असुन देखील माझा नातवाला त्रास दिला. त्यानंतर आज रोजी आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आलो असता पोलीसानी आम्हाला दवाखाना यादी देवुन उपचारकामी सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल बारामती येथे पाठवुन दिले आहे. व आम्ही नातु  याच्यावर औषधउचार घेतले नंतर  स्टेशन येथे  इसम रा डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे यांचेविरुध्द तक्रार दिली असून तपास मा. SDPO सुदर्शन राठोड करीत आहे.बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 70/2025 BNS-118(1), जे. जे. अॅक्ट 72 (1), मुलांची काळजी आणि सं अधि क 2015, अँट्रो सिटी कलम 3(1) (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


*वरील बातमी बारामती शहर पोलीस स्टेशनमधून  प्रेस नोट आली होती,त्यामुळे ती तशीच छापली गेली परंतु यामध्ये अनावधानाने नावं छापली गेली ती तात्काळ दुरुस्ती करण्यात आली असून याबद्दल संपादक दिलगिरी व्यक्त करीत आहे.*

No comments:

Post a Comment