नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव २०२५ चे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 15, 2025

नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव २०२५ चे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते..!

नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव २०२५ चे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते..!
बारामती:-बारामती शारदा प्रांगण या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ व बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव २०२५ चे उद्घाटन (दि:१४) रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, तालुका महिला अध्यक्षा ज्योती लडकत, विजया अलगी, रेहाना शेख, नीता देवकाते, सोना काळे या सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


महोत्सवामध्ये जवळपास ५६ वेगवेगळे महिला बचत गटाचे स्टॉल दाखल झालेले आहेत. याच नवतेजस्वीनी जिल्हा महोत्सवाचे उद्घाटनाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण व शहरी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तु व खाद्य पदार्थ यांना स्थानिक बाजारपेठ व उद्योजकीय संधी उपलब्ध व्हावी व बचत गटातील महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत व्हावी या साठी सदर जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री करिता भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मार्च २०२५ रोजी (दुपारी ४.००) वाजता  भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते  करण्यात आले. १४ मार्च ते १६ मार्च  रोजी सकाळी १० ते सायंकाळी ९:३० वाजेपर्यंत प्रदर्शन व विक्री सर्वांसाठी खुले राहणार आहे.


प्रदर्शनाच्या उद्घाटन नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते (दि:१५) रोजी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम) पुणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment