लोणी भापकर येथे १७ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 15, 2025

लोणी भापकर येथे १७ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन..

लोणी भापकर येथे १७ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन..
बारामती, दि. १६ : नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागाकडील अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे लोणी भापकर येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.  

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न विहित मुदतीत सुटले तर नागरीकांचे जिल्हास्तरावर येण्याचे प्रमाण घटून त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होते. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता मुख्यमंत्री यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्याअंतर्गत राज्याच्या प्रशासनात १०० दिवसात प्राधान्याने करावयाच्या बाबींबाबत सविस्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचना दिल्या आहेत, नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाहीत दिनात मांडाव्यात, असे आवाहन तहसीलदार श्री. शिंदे यांनी  केले आहे.  

No comments:

Post a Comment