आर पी आयच्या वतीने पंचायत समितीला निवेदन सादर..
बारामती:- बारामती तालुक्यातील करंजे, सोमेश्वरनगर, पारवडी, मोरगांव, उंडवडीसुपे,
सांगवी, सोनगांव या ठिकाणी संविधान भवन उभे करणेबाबत निवेदन दिले या निवेदनात
बारामती तालुक्यातील करंजे, सोमेश्वरनगर, पारवडी, मोरगांव, उंडवडीसुपे, सांगवी,
सोनगांव या ठिकाणी संविधान भवन उभे करणेबाबत शासनाचा तसा जी. आर. तसेच निधी
देखील उपलब्ध असताना अद्यापपर्यंत उचीत कार्यवाही झाली नाही. तसेच दलीतवस्ती
सुधार योजनेअंतर्गत आलेला निधी देखील परत जात आहे.
तरी बारामती तालुक्यातील करंजे, सोमेश्वरनगर, पारवडी, मोरगांव,
उंडवडीसुपे, सांगवी, सोनगांव या ठिकाणी संविधान भवन उभे करणेबाबत अंमलबजावणी
करण्यात यावी ही विनंती. अन्यथा आमच्या पक्षातर्फे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
मग होणारे परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील याची
आपण गंभीर दखल घ्यावी. सदर निवेदनाचा प्रस्ताव समजून वरिष्ठ कार्यालयास अहवाल
सादर करावा.असे निवेदन मा. गटविकास अधिकारी सोए (उ.श्रे.)
पंचायत समिती, बारामती,
ता. बारामती, जि. पुणे.यांना आरपीआय तालुका अध्यक्ष संजय वाघमारे यांनी दिले.
No comments:
Post a Comment