जिजाऊ च्या संस्कार व विचारांची गरज: सुनंदा पवार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 12, 2025

जिजाऊ च्या संस्कार व विचारांची गरज: सुनंदा पवार

जिजाऊ च्या संस्कार व विचारांची गरज: सुनंदा पवार 
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान 

बारामती:- अत्याधुनिक युगात सर्व काही पैसा आहे ही बाब रूढ होत असताना मानवाच्या सुरक्षित जीवनासाठी  राजमाता जिजाऊ च्या संस्कार व विचारांची आज  नितांत गरज असल्याचे प्रतिपादन बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२५ चे प्रदान करण्यात आले याप्रसंगी सुनंदा पवार बोलत होत्या.

या प्रसंगी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, मराठा सेवा संघाच्या विश्वस्त जयश्री सातव व सावित्री तुपे, अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा  अध्यक्षा ऍड प्रियांका काटे,तालुका अध्यक्षा ऍड सुप्रिया बर्गे व डॉ सुहासिनी सातव  अनिता गायकवाड,ज्योती लडकत,
आरती शेंडगे,वनिता बनकर, उज्वला शिंदे शुभांगी महाडिक, पुनम पिसे ,मृदुल देशपांडे ,योजना देवळे, जयश्री दाते,सुचेता ढवाण, अल्पा भंडारी सुनिता शहा ,शुभांगी जामदार ,अपर्णा खटावकर आदी मान्यवर उपस्तीत होत्या.

महिलांनी विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवून पुरुषाच्या बरोबरीने  देशाच्या  यशात स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे त्यामुळे वर्षभर महिला दिन साजरा करण्याची गरज असल्याचे शरयु फाउंडेशनच्या  अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सांगितले.

विविध क्षेत्रातील महिलांच्या कला गुणांना वाव भेटावा त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढावा त्यांच्या कार्याची दखल घेऊन इतर महिलांनी तयार व्हावे म्हणून या साठी राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत  महिलांना सदर पुरस्काराने सन्मानित केले   जात असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षा अर्चना सातव यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.

 सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा सहकार, कृषी,वैदकीय,बचत गट, आदी क्षेत्रातील महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या मध्ये सुनंदा पवार, डॉ मनीषा देशमुख, अँड मनीषा बर्गे ,नकुशा शिंदे निंबाळकर, सीमा चव्हाण, विमल माळी ,सविता यादव, नंदा बहिरमल, हेमलता फरतडे ,डॉ सुप्रिया बोबडे ,गीतांजली थोरात ,वनिता घाडगे, सुवर्ण बरबडे, उज्वला कोकरे, नाजनीन तांबोळी यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.

ब्रिटिश पूर्व इतिहास ते आत्याधुनिक भारत मधील महिला कायदे, प्रथा या विषयी महिला आयोग च्या सदस्या अँड मनीषा बर्गे यांनी व्याख्यान दिले

जिजाऊ च्या पुरस्काराने शाबासकी मिळाली कार्याचे चीज झाले या पुढील काळात जोमाने  आदर्शवत कार्य करत राहू असे पुरस्कारार्थी महिलांनी सांगितले 

सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिजाऊ सेवा संघाचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी केले

चौकट: 
पुरस्कार देताना चौलंगावर बसवून,औक्षण करून,खांद्यावर भगवा शेला टाकून, सन्मान पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान होत असताना सन्मान मूर्ती महिलांना गहिवरून आले.

No comments:

Post a Comment