हल्लेखोरांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे असे कठोर शासन झाले पाहिजे यासाठी बारामती येथे दिले निवेदन..
बारामती:-महाराष्ट्रात धनगर बांधवांवर जो अत्याचार चाललेला आहे, त्याने भारतातील संपूर्ण समाज दुःखी आहे. जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे यांना रॉड ने दिलेले चटके आणि बिडकीन ता. पैठण येथे बारामतीतील टेंगले कुटुंबातील सहा मेंढपाळ बांधवांना झालेली अमानुष मारहाण या दोन्ही घटनामुळे संपूर्ण समाज दुःखी आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या क्रूर घटना अत्यंत वेदनादायी आहेत. या घटनामधील आरोपी यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन, पोलीस मित्र संघटना, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे वतीने मा. प्रांत साहेब बारामती, मा. तहसीलदार साहेब बारामती, मा. पोलीस निरीक्षक साहेब बारामती शहर पोलीस स्टेशन बारामती यांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारताना अधिकारी वर्ग सुद्धा हळहळत होते. हल्लेखोरांना कठोर शासन होण्यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करू असे अधिकारी यांनी सांगितले. निवेदन देताना WDSO- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव आटोळे सर, WDSO चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल बाराते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद वाघमोडे पाटील, पुणे जिल्हा नेते अनिल आवाळे, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली व भारत राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख गजानन महादेव भगत, पोलीस मित्र संघटना बारामती जन संपर्कप्रमुख रोहित सुरेश तावरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment