धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवणाऱ्या इसमावर अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, श्री. गणेश बिरादार यांची कडक कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 3, 2025

धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवणाऱ्या इसमावर अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, श्री. गणेश बिरादार यांची कडक कारवाई..

धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवणाऱ्या इसमावर अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, श्री. गणेश बिरादार यांची कडक कारवाई..
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला आहे. सदसच्या माहितीच्या अनुशंगाने लागलीच सदर इसमास पोलीस स्टाफच्या मार्फत  ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपणीय माहितीचे अनुसार औरंगजेबाचा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला. 

सदर इसमाच्या कृत्यामुळे धार्मिक तेड निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस निरीक्षक, विलास नाळे, बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी त्याचे विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 127 प्रमाणे प्रस्ताव तयार करून तो श्री. गणेश बिरादार विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना सादर केला असता यावर सुनावणी घेऊन सदर इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाल्याने, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, त्याने योग्य व लायक जामिनदार न दिल्याचे त्याची १४ दिवसांकरीता रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील वेगवेगळ्या सोशल मीडिया साइडवर, तसेच नागरिक ठेवत असलेल्या व्हाट्सअप  स्टेटसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्या माध्यमातून कोणत्याही धर्मा विरुद्ध तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर यापुढे देखील उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास तसेच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान मास चालु असून आगामी काळात हिंदू व मुस्लिम समाजाचे उत्सव येणार असून सदर उत्सवांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह असे स्टेटस किंवा अफवा पसरवणाऱ्या मजकुराचा संदेश कोणत्याही धर्माच्या इसमाने कोणत्याही धर्मा विरुद्ध सोशल मीडियावर शेअर करू नये असे आवाहन नागरीकांना करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण श्री.पंकज देशमुख सो. मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री.गणेश बिरादार सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री. सुदर्शन राठोड सो. यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment