जागृती दिव्यांग विश्वस्थ संस्था, बारामतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 4, 2025

जागृती दिव्यांग विश्वस्थ संस्था, बारामतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..

जागृती दिव्यांग विश्वस्थ संस्था, बारामतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..
बारामती:- जागृती दिव्यांग विश्वस्थ संस्था, बारामती.चे अध्यक्ष श्री. दिपक विश्वनाथ गायकवाड ,श्री. अजिज शेख उपाध्यक्ष यांच्या सह पदाधिकारी व सदस्य यांनी निवेदन दिले,यामध्ये तक्रार करण्यात आली की, आम्ही वरील ठिकाणचे रहिवासी असून, बारामती व शहर परिसरामध्ये दिव्यांग संस्था चालवत असुन, सदर दिव्यांगांना दिले जाणारे संजय गांधी निराधार प्रकरण करीत असतांना, सदर योजनेमध्ये दिव्यांगाच्या प्रकरणात मुलांची
अट नसताना देखील त्यांची प्रकरण नाकारली जातात. तरी तहसिल कार्यालय, बारामती येथील कर्मचारी  दिव्यांगाना नाहक त्रास देवुन अपमानास्पद वागणुक देत आहेत. आणि
अपंगांचा तिरस्कार करीत आहेत. सद्यस्थतीमध्ये देशाचे व राज्याचे माजी आमदार व खासदार हे धडधाकट असताना त्यांना मुले असताना ते पेन्शन घेवू शकतात परंतु दिव्यांगांना कोणीही सांभाळ करीत नाहीत ते कुटूंबावरती बोज असतात अशा घटकावरती अन्याय होत आहे. तरी आपण दिव्यांगांना सरसकट रू
१०,०००/- ची पेन्शन देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. कारण लाडकी बहिण योजनेमध्ये
सरकारने सरसकट रु १५०० दिले. परंतु दिव्यांगांना रु १५०० पेन्शन देता येत नाही तरी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तरी आपण यामध्ये जातीने लक्ष घालावे. तरी तहसिल कार्यालयामध्ये संजय गांधी प्रकरण समाविष्ठ करताना दिव्यांगांची मुले सज्ञान झाल्यामुळे त्यांचे पेन्शन बंद करतात. तरी मा. तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये आवक-जावक विभागाची जबाबदारी असणारे यांना विचारणा केल्याशिवाय प्रकरणावरती पोहोच देत नाहीत. त्यामुळे दोन / दोन महिने प्रकरण तलाठी कार्यालयात पडुन राहतात व त्यावर कोणतीही कारवाई
होत नसलेने प्रकरणे गहाळ होतात. व त्यामुळे दिव्यांगांना पुन्हा पुन्हा प्रकरणे सादर करावी लागल असल्याने खर्चास नाहक बळी पडत आहेत. तरी त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून आम्हा दिव्यांगांना योग्य तो न्याय दयावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment