IMA महाराष्ट्र राज्य IMA बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे वैद्यकीय न्यायशास्त्र परिषद संपन्न..
बारामती:-IMA महाराष्ट्र राज्य IMA बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे वैद्यकीय न्यायशास्त्र परिषद भरविण्यात आली.
या परिषदेत वैद्यकीय क्षेत्राला लागू होणारे कायदे त्यातील बारकावे, त्यांचे काटेकोर पालन, महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन इत्यादी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेत 500 डॉक्टरांनी सहभाग घेतला.
डॉ. संतोष कदम अध्यक्ष आय. एम. ए .महाराष्ट्र , डॉ. अनिल आव्हाड सेक्रेटरी महाराष्ट्र IMA, डॉ. बिपीन चेकर अध्यक्ष मेडिकोलीगल सेल IMA महाराष्ट्र, डॉ. होझी कपाडिया अध्यक्ष आय. एम.ए. मुख्यालय अशा मान्यवरांची उपस्थिती या परिषदेला लाभली. वरील मान्यवर मेडिकोलीगल सेलच्या इतर सदस्यांनी महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन व चर्चा केली. डॉ. साधना कोल्हटकर IMA बारामती, डॉ. निकिता मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिषदेचे नियोजन केले. डॉक्टर अशोक तांबे यांनी विशेष मार्गदर्शन केले. ही परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. दीपिका कोकणे आणि डॉ. सौरभ मुथा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment