बारामतीचा सुपुत्र अकबर शेख हा ठरतोय पुणे येथील गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ...
बारामती:- येथील कसब्याचे रहिवाशी अकबरभाई शेख यांचे शालेय शिक्षण बारामती येथेच झाले सुरवातीला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतीय सैन्य दलात भरती झाले त्यांनी देशाचे रक्षण करत देशाच्या विविध भागात आपले कर्तव्य बजावत भारतीय सैन्य दलातील सेवा पूर्व झालेनंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये भरती झाले त्यांच्यातील उर्मी आणि कर्तव्य दक्षता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती...
अकबरभाई हे पुणे क्राईम ब्रँच युनिट ५ मध्ये रुजू झाले आणि त्यांनी सक्षमपणे पुण्यातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावला तसेच काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटातील एका तरुणीवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरला असताना...
या घटनेतील आरोपीचा शोध लावण्यासाठी पुणे क्राईम ब्रँचचे अधिकारी यांच्यासह अकबरभाई यांनी मुख्य भुमिका बजावली आणि आरोपीचा शोध अंदाजे चार हजार सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे शोध घेऊन आरोपीला जेरबंद केले होते...
आता नुकत्याच घडलेल्या पुणे स्वारगेट शिवशाही बसमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या अत्याचाराची बलात्कारातील आरोपीला शोधण्यासाठी अकबरभाई यांच्यासह डॉग स्कोड (श्वानपथक) यांच्याबरोबर टीव्हीवर विविध चॅनलवर अकबरभाई यांना पाहिल्यावर असे वाटले की समाजविघातक गुन्हेगाराचा कर्दनकाळ म्हणजे आमचा महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील एक घटक बारामतीकर अकबरभाई..
एक बारामतीकर म्हणून आम्हाला अकबरभाई आपला सार्थ अभिमान आहे. आपल्याकडून महाराष्ट्रराज्य पोलिस दलामध्ये अशीच कर्तव्यदक्ष सेवा घडावी आणि गुन्हेगारावर आपली आणि आपल्या पुणे पोलिस क्राईम ब्रँचची जरब बसो हि अपेक्षा
आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
अकबरभाई आम्हाला एक मित्र म्हणून एक बारामतीकर म्हणून आपला सार्थ अभिमान आहे....
शब्दांकन..मुनिर तांबोळी बारामती..
मो.. ९८९०३६२९८६....
No comments:
Post a Comment