डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवानिमित्त संघर्ष युवा प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रम साजरे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 17, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवानिमित्त संघर्ष युवा प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रम साजरे..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवानिमित्त संघर्ष युवा प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रम साजरे..
बारामती:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवानिमित्त संघर्ष युवा प्रतिष्ठान बारामती शाहू महाराज चौक प्रतिभा नगर यांच्या विद्यमाने भीम जयंती महोत्सव 2025 च आयोजन करण्यात आले होते दिनांक 11 एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय डान्स कॉम्पिटिशन स्पर्धा सादर करते रोहन माघाडे  व टीम तसेच  दिनांक 12 एप्रिल रोजी खास महिला भगिनींसाठी माय होम मिनिस्टर चांडाळ चौकटीच्या करामती फेम अभिनेते रामभाऊ जगताप यांचा मनोरंजनातून प्रबोधन करणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला माय होम मिनिस्टर खेळातील विजेत्या महिलांना प्रथम पारितोषिक फ्रीज दुतीय पारितोषिक कुलर तृतीय पारितोषिक मिक्सर चौथे पारितोषिक फॅन भेट देण्यात आले या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, बारामती शहर चे पोलीस निरीक्षक  विलास नाळे, माझी ज्येष्ठ नगरसेवक अॅड सुभाष आप्पा ढोले, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पुणे जिल्हा बँक संचालक संभाजी होळकर, माजी नगरसेवक सुधीर सोनवणे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, माजी नगरसेविका  सौ.आरती शेंडगे, माझी उपनगराध्यक्ष विजय खरात, बबन लोंढे अरविंद बगाडे, प्रा डॉ डी व्ही सरोदे, विशाल जाधव, नितीन शेलार, 𝗠𝗜𝗠  जिल्हाध्यक्ष फैयाज शेख,मंगेश गिरमे  हे मान्यवर उपस्थित होते आमराई परिसरातील महिला भगिनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या भीम जयंती महोत्सवाची आयोजन माजी उपनगराध्यक्षा ज्योती बल्लाळ, नवनाथ बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष, निलेश मोरे सचिन जाधव, सोमनाथ आटोळे, विशाल गायकवाड, राज साळुंखे, सागर शीलवंत, गौतम लोंढे, संग्राम लोंढे  व संघर्ष युवा प्रतिष्ठान बारामती यांच्या वतीने करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment