युद्धकला प्रशिक्षण देणारे मास्टर श्री.नितीनजी शेलार यांना महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार प्रदान..
बारामती:-बारामती येथील युद्धकला प्रशिक्षण देणारे मास्टर नितीन शेलार यांना शालिनी फाऊंडेशन तर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार 2024-2025 प्रदान करण्यात आला.शेलार यांनी महाराष्ट्रातील 28 हजार तरुण-तरुणींना युद्ध कलेचे प्रशिक्षण दिले आहे.तसेच अनेक मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आजही देत आहेत.नितीन शेलार यांनी ऐतिहासिक चित्रपट मणिकर्णिका,नायका देवी आणि अनेक मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये स्वाॅर्ड फाईट मास्टर म्हणुन काम करत आहेत व स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत.त्यांच्या युद्ध कला प्रशिक्षणाची दखल घेऊन शेलार यांना महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रमंडळी कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment